scorecardresearch

Ankita Bhandari Murder: “पुरावे नष्ट करण्यासाठी रिसॉर्टचे पाडकाम केले” पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप, अंकितावर अंत्यसंस्कार करण्यास नकार

पीडितेच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे

Ankita Bhandari Murder: “पुरावे नष्ट करण्यासाठी रिसॉर्टचे पाडकाम केले” पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप, अंकितावर अंत्यसंस्कार करण्यास नकार

१९ वर्षीय अंकिता भंडारीच्या खुनानंतर उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहे. या खून प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांनी सरकारच्या कारवाईविरोधात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पुलकित आर्याच्या ‘वनतारा’ रिसोर्टचा काही भाग मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानंतर शुक्रवारी पाडण्यात आला होता. याच रिसॉर्टमध्ये अंकिता रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. अंकिताच्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. पीडितेवर अत्यसंस्कार करण्यासही कुटुंबियांनी नकार दिला आहे.

Ankita Bhandari Murder: “मी गरीब असले तरी स्वत:ला १० हजारांसाठी विकणार नाही” मृत्यूपूर्वीचे अंकिताचे संभाषण आले समोर

पीडितेच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरुणीच्या मृतदेहावर जखमा असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, पीडितेवर अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रशासनाकडून नातेवाईकांची मनधरणी करण्यात येत आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी आणि काही स्थानिकांनी श्रीनगर-केदारनाथ महामार्ग रोखून धरल्याचेही वृत्त आहे.

Ankita Bhandari Murder Case: फेसबूक फ्रेंडमुळे उलगडलं हत्येचं गूढ, धक्कादायक कारण आलं समोर

अंकिता भंडारी खून प्रकरणात उत्तराखंडमधील भाजपाचे माजी नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलिकत मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात पुलकितसह रिसॉर्टमधील त्याचे दोन साथीदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच विनोद आर्या यांचे भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. रिसॉर्टवरील कारवाईबाबत उत्तराखंडमधील विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. “हा एक नियोजित खून आहे. रिसॉर्टचे पाडकाम पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आल्याचा लोकांना संशय आहे” अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने ‘एनडीटीव्ही’ या वृत्त वाहिनीला दिली आहे.

Ankita Bhandari Murder Case: तरुणीच्या खुनानंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले, ओबीसी आयोगाच्या उपाध्यक्षपदावरुन भावाची हकालपट्टी

आरोपींचे सत्ताधारी पक्षासोबत संबंध असल्याने या प्रकरणात पोलीस धीम्या गतीने तपास करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानंतर विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेच्या विरोधात हृषीकेशमधील स्थानिकांनी शनिवारी तीव्र विरोध प्रदर्शन केले. न्यायाची मागणी करत शेकडो लोकांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घातला होता. संतप्त नागरिकांनी पुलकित आर्याचे रिसॉर्ट पेटवून दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या