राहुल गांधींचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशातील काळा पैसा आणण्याच्या गोष्टी करतात, असे असताना मद्यसम्राट विजय मल्या आणि आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी हे अद्यापही परदेशातच का, असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे एका निवडणूक जाहीर सभेत केला.
परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची भाषा मोदी यांनी केली, मग मल्या आणि ललित मोदी अद्यापही परदेशातच कसे, एकीकडे मोदी काळा पैसा आणण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे मल्या देश सोडून पसार होतो, असे राहुल गांधी म्हणाले.
मल्या देशाबाहेर जाण्यापूर्वी दोन-तीन दिवस अगोदर त्यांनी संसदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्या दोघांमध्ये कोणती चर्चा झाली, असे गांधी म्हणाले. मोदी काळ्या पैशांविरुद्ध लढा देत असताना भाजप सरकारने काले धन को सफेद करो योजना आखली असल्याची टीका गांधी यांनी केली आणि भाजपने सत्य सांगावे अशी मागणी केली.
मोदी आसाममध्ये येऊन भाषण देतात, मात्र मल्या, ललित मोदी किंवा फेअर अॅण्ड लव्हली योजनेबद्दल काहीच बोलत नाहीत,
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2016 रोजी प्रकाशित
मल्या, ललित मोदी अद्याप परदेशात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशातील काळा पैसा आणण्याच्या गोष्टी करतात

First published on: 01-04-2016 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why vijay mallya lalit modi still abroad rahul gandhi asks pm