खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक नवा व्हिडीओ प्रदर्शित करत १३ डिसेंबर किंवा त्याआधी भारतीय संसदेच्या मूल तत्वांनाच धक्का पोहोचवणार असल्याचा इशारा दिला आहे. १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यापार्श्वभूमीवर गुरपतवंत सिंग पन्नूनने दिलेली धमकी गांभीर्याने घेण्यात आली आहे.

गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येचा प्रयत्न भारतीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या पार्श्वभूमीवर अफजल गुरूचा फोटो घेऊन दिल्ली बनेगा खलिस्तान अशा कॅप्शनचा व्हिडीओ गुरपतवंत सिंग पन्नूने शेअर केलाय. २००१ साली भारतीय संसदेवर अफजल गुरू याने दहशतवादी हल्ला घडवला होता. त्याला २०१३ साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये भारतीय संसदेचे तत्त्वे नेस्तनाबूत करू, असं पन्नू म्हणाला आहे.

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

हेही वाचा >> खलिस्तानवादी पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळला; भारताला जूनमध्ये इशारा देण्यात आल्याचा दावा

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे पन्नूने दिलेल्या धमकीवरून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतविरोधी कारवायांसाठी पन्नूनला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI च्या काश्मीर खलिस्तानी (K-2) विभागाने आदेश दिले असल्याचं वृत्त इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

दरम्यान, २२ नोव्हेंबरच्या फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्या करण्याचा कट अमेरिकेने हाणून पाडला. या कटात सहभागाबद्दल अमेरिकेने भारताला इशारा दिला होता.कॅनडामध्ये खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याची शक्यता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर पन्नू प्रकरणामुळे नवा वादंग निर्माण होण्याचे संकेत आहेत.

कोण आहे पन्नू?

पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. पन्नू हा खलिस्तान समर्थक फुटीरतावादी गट ‘शिख फॉर जस्टिस’चा म्होरक्या आहे. भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना तो सातत्याने धमक्या देत असतो. त्याने अलीकडे कॅनडाच्या नागरिकांना ‘एअर इंडिया’च्या विमानांनी प्रवास न करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्याने खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या ‘कनिष्क’ विमानात घडवलेल्या बॉम्बस्फोटाची आठवण करून दिली होती. या दुर्घटनेत तीनशेहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यातील बहुसंख्य कॅनडाचे नागरिक होते.