दिवाळीत पूजा झाल्यावरच मी फटाके फोडणार. सणासुदीत वेळेची मर्यादा घालता येणार नाही असे सांगताना हिंदू परंपरेत आम्ही कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा शब्दात भाजपाचे खासदार चिंतामणी मालवीय यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला. हिंदू परंपरेचे पालन केल्याने मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, असे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मध्य प्रदेशमधील भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री १० नंतर मी फटाके फोडणार, असे सांगत त्यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिले. हिंदू परंपरेत आम्ही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. माझ्या धार्मिक परंपरेचे पालन केल्याने मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, असेही त्यांनी नमूद केले.

मालवीय यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेतही याचा पुनरुच्चार केला. हिंदू सणांमध्ये तुम्ही वेळेची मर्यादा घालू शकत नाही. मोगलांच्या काळातही असे निर्बंध नव्हते. हा निर्णय मला मान्य नाही, असे त्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे?
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास नकार दिला. मात्र, दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्यास अनुमती दिली. ध्वनीपातळीचे उल्लंघन करणाऱ्या आणि अन्य प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले तर, संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will burst crackers only when i finish puja says bjp mp chintamani malviya on sc verdict
First published on: 24-10-2018 at 05:56 IST