संरक्षण मंत्री र्पीकर यांची माहिती

भारतीय हवाई दलाने महिलांना लढाऊ वैमानिकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नौदलातही महिलांना महत्त्वाची कामे देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे, पण सध्या तरी नौदलात महिलांना प्रत्यक्ष लढाईशी संबंधित काम देण्याचा विचार नाही. महिलांना नौदलात लष्करात निवृत्तीपर्यंत सेवेची संधी देण्याच्या निर्णयावर दिल्ली उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याला सरकारकडून आव्हान दिले जाणार आहे. लैंगिक मुद्दय़ावर महिलांची प्रगती रोखता येणार नाही, त्यामुळे त्यांना परमनंट कमिशन म्हणजे निवृत्तीपर्यंत सेवेची संधी देण्यात यावी, असा निकाल न्यायालयाने दिला असला तरी त्यात काही त्रुटी असून नौदलात लैंगिकतेवर आधारित समानता असल्याचे आधीच गृहीत धरले
आहे.
संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी नौदल कमांडर्सची बैठक आज घेतली, त्यानंतर ते म्हणाले की, जहाजावर विमान रात्रभर राहणार असेल ती स्थिती सोडून महिलांना नौदलातील विमाने चालवण्याची संधी दिली जाईल. येत्या काही दिवसात त्याबाबतची घोषणा केली जाईल. नौदलाने असा प्रस्ताव मांडला आहे की, सागरी टेहळणीसाठी महिला वैमानिकांना संधी देण्यात यावी. २००८ मध्ये नौदलाने महिलांना शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन देण्याची भूमिका जाहीर केली होती. महिलांना समान संधी देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या एक-दोन मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात सरकार अपील करणार आहे.