जपानमध्ये बुलेट ट्रेन दरवाजा उघडा असतानाही २८० किमी ताशी वेगाने धावल्याची घटना समोर आली आहे. जवळपास एक मिनिट बुलेट ट्रेनचा दरवाजा उघडा होता. बुधवारी हा प्रकार घडल्याची माहिती ऑपरेटरने दिली आहे. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा दरवाजा उघडा राहिला होता. जपानमधील ट्रेन नेहमीच आपली सुरक्षा आणि वक्तशीरपणासाठी ओळखली जाते. त्यामुळे जपानमध्ये अशा प्रकारची घटना होणं फार दुर्मिळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, टोकियोला जाणारी ट्रेन शेंदई स्टेशनमधून निघाल्यानंतर भोगद्याजवळ आली तेव्हा इमर्जन्सी लाईट लागले होते. नवव्या डब्याचा दरवाजा उघडा असल्याने वॉर्निंग लाइट सुरु असल्याचं कंडक्टरने पाहिलं. यानंतर बोगद्यातच ट्रेन थांबवण्यात आली होती. कंडक्टरने तपासणी केली असता दरवाजा पूर्णपणे उघडा असल्याचं समोर आलं अशी माहिती प्रवक्त्याने दिली आहे.

यावेळी ३४० प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कोणही जखमी झालेलं नाही. सर्व तपासणी करण्यात आल्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आली. याप्रकरणी माफी मागण्यात आली असून, पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी घेऊ असं सांगण्यात आलं आहे.

जलद गतीचं रेल्वे नेटवर्क उभारण्यात सर्वात आधी जपानानेच सुरुवात केली. आपला वक्तशीरपणा आणि सुरक्षेसाठी जगभरात त्यांचं उदाहरण दिलं जातं. यासोबतच इमर्जन्सी स्टॉप सिस्टीमदेखील ट्रेनमध्ये आहे ज्यामुळे मोठा भुकंप होण्याआधी ट्रेनचा वेग आपोआप कमी होतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With open door japan bullet train runs at 280 kilometres per hour sgy
First published on: 23-08-2019 at 12:51 IST