Woman Suicide : ४० वर्षांच्या एका महिलेने लोकांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला वैतागून आयुष्य संपवलं आहे. ही घटना केरळमधली आहे. पुरुषांच्या समूहाने तिला सातत्याने तू तुझ्या मित्राशी का बोलत होतीस ? हा प्रश्न सातत्याने विचारला. या प्रश्नाला रसीना नावाची महिला कंटाळली आणि तिने तिचं आयुष्य संपवलं. केरळमधल्या धर्मधाम या ठिकाणी ही महिला राहते. मंगळवारी तिचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला. तिच्या मागे तिचा पती आणि तीन मुलं असं कुटुंब आहे.
नेमकं काय घडलं?
रसीनाच्या आत्महत्येप्रकरणी सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. व्ही सी मुबाशीर, के. ए. फैसल आणि व्ही. के. रफान्स अशी या तिघांची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या तिघांनी रसीनाला सातत्याने तू तुझ्या मित्राशी रस्त्यावर का बोलत उभी असतेस? हे विचारुन विचारुन तिच्या मागे तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या तिघांनी तिच्या नातेवाईकांसमोरही तिला हाच प्रश्न वारंवार विचारुन हैराण केलं होतं. त्यामुळे या ४० वर्षीय महिलेने आयुष्य संपवलं. या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. या तिघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे. त्यात या महिलेने म्हटलं आहे की सातत्याने तिचा अपमान होत होता. प्रचंड मानसिक छळ आणि त्रास असह्य झाल्याने मी आत्महत्या करते आहे असं या महिलेने सुसाईड नोटमध्ये मह्टलं आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याची माहिती आम्ही घेत आहोत असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
(टीप-आत्महत्या हा कुठल्याही घटनेवरचा इलाज किंवा मार्ग नाही. त्यामुळे असं टोकाचं पाऊल मुळीच उचलू नका. तुमच्या मनात असे विचार असतील तर ते विचार मनातून काढून टाका. तुम्हाला अशा कुठल्याही प्रसंगात मदत हवी असेल तर खालील क्रमांकांवर संपर्क साधा.)
AASRA
Contact: 9820466726
Email: aasrahelpline@yahoo.com
Timings: 24×7
Languages: English, Hindi
Snehi
Contact: 9582208181
Email: snehi.india@gmail.com
Timings: 10am – 10pm, all days
Languages: English, Hindi, Marathi