विवाहितेच्या दहा वर्षांच्या मुलाला तिच्या प्रियकराने ठार केलं. विवाहितेचं आणि या तरुणाचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती या मुलाला मिळाली होती, ज्यानंतर घटना घडली. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी या ठिकाणी ही घटना घडली आहे. वाराणासीचे पोलीस उपायुक्त गौरव बन्सवाल यांनी याबाबत माहिती दिली.
काय म्हणाले पोलीस उपायुक्त?
आमच्या पोलीस ठाण्यात १० वर्षांचा मुलगा हरवला असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. आम्ही त्याचा शोध घेत असताना आम्हाला हे कळलं की त्याच्या आईचे एका माणसाबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. फैजान असं या माणसाचं नाव आहे. आम्ही त्यानंतर फैजानला ताब्यात घेतलं. त्याने चौकशी दरम्यान गुन्हा मान्य केला. त्याची चौकशी करत असताना त्याने सांगितलं की १० वर्षांचा तो मुलगा आमच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली.
फैजान असं आरोपीचं नाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजान आणि दहा वर्षांच्या मुलाच्या आईचे अनैतिक संबंध मागच्या दोन वर्षांपासून होते. ही महिला रामनगर भागात राहते. तिच्या नवऱ्याचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं आहे. या महिलेला १० वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी होती. मात्र आता फैजानने १० वर्षांच्या या मुलाची हत्या करण्यात आली आहे. त्यामागे फैजानच आहे ज्याची कबुली त्यानेच दिली. टाइम्स ऑफ इंडिया ने हे वृत्त दिलं आहे. फैजान आणि दहा वर्षांच्या मुलाच्या आईचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. पोलिसांना जेव्हा दहा वर्षांच्या मुलाच्या आईचे आणि फैजानचे अनैतिक संबंध असल्याची बाब समजली तेव्हा त्यांनी तपास हा पैलू लक्षात घेऊन केला. सुरुवातीला फैजानला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा साथीदार रशिदलाही ताब्यात घेण्यात आलं. या दोघांनीही गुन्हा कबूल केला ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री या मुलाची हत्या केल्याची कबुली फैजानने दिली. पोलिसांना फैजानने १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह कुठे लपवला आहे तेदेखील सांगितलं ज्यानंतर पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन गेले. तिथे या मुलाचा मृतदेह आढळून आला.
दहा वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या
काही दिवसांपूर्वी दहा वर्षांच्या मुलाने फैजानला आणि त्याच्या आईला एकत्र पाहिलं. त्यामुळे फैजानला हा मुलगा प्रेमसंबंधातला अडथळा वाटू लागला. त्यानंतर या मुलाला फैजान आणि त्याचा मित्र रशिद या दोघांनी गळा आवळून ठार केलं. त्याचा मृतदेह या दोघांनी शेतात लपवला होता. मुलगा बाहेर गेला तो आला नाही म्हणून त्याच्या आईने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. ज्यानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आला. यानंत पोलिसांनी जेव्हा शोध सुरु केला तेव्हा सगळा प्रकार समोर आला.