भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचा शोध घेण्यासाठी एका महिला अँकरने थेट समुद्रात उडी घेतली. आज तक या वृत्त वाहिनीच्या अँकर श्वेता सिंह यांनी स्कूबा डायव्हिंग द्वारे समुद्रात ७० फुट खोलीपर्यंत जाऊन द्वारकेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. श्वेता सिंह यांचा द्वारकेचा शोध घेणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

अनेकांनी श्वेता सिंह यांच्या या द्वारका शोधाला शोध पत्रकारिता ठरवले आहे. श्वेता सिंह यांना फक्त ट्रोलच केले जातेय असे नाहीय या प्रयत्नासाठी अनेक युझर्सनी त्यांचे कौतुकही केले आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे.

नेटीझन्सकडून केल्या जाणाऱ्या या ट्रोलला श्वेता सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. श्रीकृष्णाच्या द्वारकेचा शोध घेण्यासाठी मी समुद्रात डुबकी मारली तर अनेकांची मने बुडाली. मला खूप अपशब्द सुनावले आता अयोध्येच प्रमाण बघून माझा जीवच घेऊ नका म्हणजे झालं. अजून करा ट्रोल असे त्यांनी टि्वट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.