अमेरिकेतील एका ६१ वर्ष महिलेला विचित्र आजार झाला आहे. या आजारामुळे महिलेच्या शरीरात मद्य तयार होऊ लागले आहे. जगातील अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. शास्त्रीय भाषेत या परिस्थितीला युरिनरी ऑटो-ब्रेवरी सिंड्रोम असं म्हणतात. या आजारामध्ये मुत्राशयात (युरिनरी ब्लॅडर) युरिनऐवजी मद्य तयार होते. त्यामुळेच महिलेच्या लघवीवाटे मद्यच बाहेर पडत आहे. ही महिला सध्या अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापिठातील रुग्णालयामध्ये या महिलेला दाखल करण्यात आलं आहे.
या महिलेला मधुमेह आणि लिव्हर सिरॉसिसचाही त्रास आहे. या महिलेवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. मात्र या महिलेची प्रकृती आणि यकृत देणारी योग्य व्यक्ती न मिळाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. या महिलेला आता अल्कोहोल अब्युज (alcohol abuse) पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अती मद्यसेवन करणाऱ्यांना या उपचार पद्धतीचा सल्ला दिला जातो.
या महिलेवर अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मद्य सेवनाच्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या महिलेला मद्यपानाची सवय असून ती माहिती लपवत असल्याची शंका व्यक्त केली. डॉक्टरांना आलेली शंका दूर करण्यासाठी महिलेच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. मात्र या महिलेच्या रक्तामध्ये मद्याचे प्रमाण अढळून आले नाही. या महिलेच्या लघवीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण अती जास्त असल्याचे अढळून आले. याला हायपरग्लाइकोसूरिया असं म्हणतात.
या महिलेला मधुमेहाचा त्रास असल्याने तिच्या लघवीमध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण अढळून आले. संशोधकांच्या मते महिलेच्या यकृतामध्ये मोठ्या प्रमाणात यीस्ट गोळा झाले आहे. त्यामुळे तिच्या यकृतामध्ये रक्तातील साखरेचे रुपांतर इथेनॉल म्हणजेच मद्यामध्ये होत आहे. यीस्ट यकृतामधील सारखरेचे सतत विघटन करत असल्याने यकृतामध्ये मोठ्याप्रमाणात इथेनॉल तयार होत आहे.
महिलेच्या शरिरात कँडिडा ग्लैबेरेटा प्रकारचे यीस्ट आहे. सामान्यपणे मानवाच्या शरिरामध्ये हे यीस्ट अढळून येते. मात्र या महिलेच्या शरिरातील यीस्टचे प्रमाण अधिक आहे. यीस्टमुळे त्रास होणाऱ्या रुग्णांना अँटी-फंगल ट्रीटमेंट दिली जाते. मात्र या ट्रीटमेंटमुळे महिलेला काहीच पायदा झाला नाही.