जपानमध्ये पारंपरिक नेक मॅन फेस्टिव्हल दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा २२ फेब्रुवारी रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला १६५० वर्षांचा इतिहास आहे. परंतु, यंदाच्या उत्सवात ऐतिहासिक घटना घडणार आहे. कारण, यंदा या नेक मॅन फेस्टिव्हलमध्ये महिलाही सहभागी होणार आहेत. एनडीटीव्हीने साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जपानमधील नेक मॅन फेस्टिव्हल ‘हाडाका मात्सुरी’ या नावाने ओळखला जातो. महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम मंदिरात आयोजित केला जातो. जपानच्या आयची प्रांतातील इनाझावा शहरातील कोनोमिया देवस्थानद्वारे आयोजित करण्यात येत असलेला हा पारंपरिक कार्यक्रम आहे. यंदा २२ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होणार असून सुमारे १० हजार पुरुष यात सहभागी होणार आहेत. तर, ४० महिलांना या उत्सवात काही विधींमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे. या विधी करण्याचा मान केवळ पुरुषांना होता. परंतु, यंदा स्त्रियांनाही हा विधी करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात
sharad pawar rohit pawar chandrakant patil
“भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

महिलंना परवागी पण अटी-शर्थी लागू

महिला या उत्सवात पूर्ण कपडे परिधान करतील. तसंच, पारंपारिक हॅपी कोट परिधान करतील. तर अर्धनग्न पुरुषांची पारंपारिक हिंसक चकमक टाळतील. ते फक्त ‘ नॉइजासा’ विधीमध्ये सहभागी होतील, ज्यासाठी त्यांना मंदिराच्या मैदानात कापडात गुंडाळलेले बांबू गवत घेऊन जावे लागेल.

आयोजक समितीचे अधिकारी मित्सुगु कातायामा म्हणाले, “आम्ही साथीच्या रोगामुळे गेल्या तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणे महोत्सव आयोजित करू शकलो नाही आणि त्या काळात आम्हाला महिलांकडून खूप विनंत्या आल्या. तसंच, पूर्वी महिलांवर कोणतीही सक्रिय बंदी नव्हती, परंतु ते स्वेच्छेने उत्सवापासून दूर राहायचे.

स्थानिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्यांनी समानतेच्या त्यांच्या मोहिमेतील एक पाऊल म्हणून या निर्णायचं स्वागत केलं आहे.

Nake Man Festival काय आहे?

नेक मॅन फेस्टिव्हलमध्ये हजारो पुरुष कमीत कमी कपड्यांचा वापर करतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण “फंडोशी” नावाचा जपानी लंगोटी वापरतात. तसंच, पांढऱ्या रंगाचे मोजेही घालतात. उत्सवाच्या विधींचा एक भाग म्हणून पुरुष सुरुवातीचे तास मंदिराच्या मैदानाभोवती धावतात आणि गोठवणाऱ्या थंड पाण्याने स्वतःला शुद्ध करतात आणि नंतर मुख्य मंदिराकडे जातात.

मंदिराच्या पुजार्‍याने फेकलेल्या १०० डहाळ्यांच्या इतर बंडलांसह दोन भाग्यवान काठ्या शोधण्यासाठी सहभागी लोकांमध्ये स्पर्धा लागते. ते शिन-ओटोको किंवा ‘निवडलेल्या माणसाला’ हाक मारतात आणि त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. कार्यक्रमाच्या शेवटी चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीमुळे पुरुष अनेकदा जखमीसुद्धा होता.