आपला पहिला विश्वचषक खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज अहमद शेहजाद गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शेहजादच्या जागी अक्रम अली खानला संघात जागा देण्यात आली आहे.
अहमद शेहजादने आतापर्यंत ८४ वन-डे सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर अक्रम अली खानकडे फक्त दोन सामन्यांचा अनुभव आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे.
Afghanistan opener @MShahzad077 has been ruled out of #CWC19#AfghanAtalan have named a replacement https://t.co/uZ4ElOHnoB
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 6, 2019
२०१९ विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासोबत सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला पराभव सहन करावा लागला आहे. या दोनही सामन्यात अहमद शेहजादला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये.
अवश्य वाचा – World Cup 2019 : धोनी कॉम्प्युटरपेक्षाही वेगवान – शोएब अख्तर