वॉशिंग्टन : इराणने ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले असले तरी इस्रायलला प्रत्युत्तर देऊ नका, असे आवाहन जागतिक नेत्यांनी केले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरॉन यांनी ब्रिटन प्रत्युत्तराच्या हल्ल्याला समर्थन देत नसल्याचे सांगितले, तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला प्रयुत्तर न देण्यासंबंधी पटवून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

इराणने रविवारी इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोण व क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात इस्रायल यशस्वी झाला असला तरी इस्रालयने प्रतिहल्ला केल्यास पुन्हा जगात पुन्हा नव्या युद्धाचे सावट निर्माण होईल या भीतीने जागतिक नेत्यांनी इस्रायलला प्रत्युत्तर न देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा >>> नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅलेक्झांडर शॅलेन बर्ग यांनी इराणने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाला लगाम घालण्याचे आवाहन त्यांनी इराणला केले. जर्मनी परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेअरबॉक यांनी जर्मनीतील इराणच्या राजदूताला बर्लिनमधील परराष्ट्र मंत्रालयात बोलाविले आणि इराणने इस्रायलवर हल्ला करू नये, असे सांगण्यात आले. अमेरिकेनेही इराणबरोबरच्या व्यापक युद्धात समर्थन देत नसल्याचे इस्रायलला सांगितले. इराण व इस्रायल यांच्यात संघर्ष झाला तर तेलाच्या किमती वाढण्याचा मोठा धोकाही अनेक नेत्यांनी व्यक्त केला.

युद्धग्रस्त प्रदेशात परत न येण्याचा पॅलेस्टिनींना इशारा

जेरुसलेम : इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना युद्धग्रस्त प्रदेशात परत न येण्याचा इशारा सोमवारी दिला. गाझा रुग्णालयातून घरी परतण्याचा प्रयत्न करताना पाच जण ठार झाल्यानंतर इस्रायलने हा इशारा दिला आहे. उत्तर गाझा हे इस्रायलच्या हमासविरुद्धच्या युद्धाचे सुरुवातीचे लक्ष्य होते आणि त्यातील बराचसा भाग बेचिराख करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी दक्षिणेकडे पलायन केले. इस्रायली सैन्याने सहा महिन्यांच्या युद्धात बहुतेक विस्थापित नागरिकांना परत येण्यापासून रोखले आहे.

हा अतिशय संवेदनशील प्रदेश आहे. अशा प्रकारे परिस्थिती चिघळते आणि शत्रुत्व वाढते तेव्हा आम्हाला चिंता वाढते. त्यामुळे काल (शनिवारी), मी केवळ इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन आमिर-अब्दोल्लाहिया आणि इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कात्झ यांनाही फोन केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-एस जयशंकर, परराष्ट्रमंत्री