यासिन भटकळ हा इंडियन मुजाहिदीनचा अत्यंत खतरनाक असा दहशतवादी आहे. बॉम्ब पेरण्यापासून ते बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंतची कामगिरी असो वा दहशतवादी हल्ल्याचे नियोजन असो किंवा मग दहशतवादी घडवण्याचे काम असो, यासिन या प्रत्येक कामात तरबेज आहे. त्यामुळेच त्याची अटक हे आपल्या तपासयंत्रणांचे सर्वात मोठे यश असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी व्यक्त केली आहे.
गृहसचिवपदावरून नुकतेच निवृत्त झालेल्या सिंह यांनी यासिनच्या अटकेबद्दल सर्वच तपासयंत्रणांचे अभिनंदन केले आहे. यासिन यापूर्वी दोनदा तपासयंत्रणांच्या तावडीतून निसटला होता. त्याला एकदा कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्याची ओळख पटवण्यात यंत्रणांना यश आले नाही. त्यावेळी तो निसटला होता. दुसऱ्यांदा तपासयंत्रणाच्या कचाटय़ात यासिन अलगद अडकला होता. मात्र, त्याही वेळी त्याने हातावर तुरी दिलीच. यावेळी मात्र सर्व तपासयंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या मागावार होत्या. त्यामुळेच त्याला पकडणे शक्य झाले आहे. तो अत्यंत खतरनाक असा दहशतवादी असून त्याच्याकडून देशातील अनेक गुन्हय़ांचे तसेच इतरही दहशतवाद्यांचे धागेदोरे मिळू शकत असल्याचे सिंह म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
अत्यंत खतरनाक दहशतवादी
यासिन भटकळ हा इंडियन मुजाहिदीनचा अत्यंत खतरनाक असा दहशतवादी आहे. बॉम्ब पेरण्यापासून ते बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंतची कामगिरी असो वा दहशतवादी हल्ल्याचे नियोजन असो किंवा मग दहशतवादी घडवण्याचे काम असो
First published on: 30-08-2013 at 05:08 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yasin bhatkal is the most dangerous terrorist former union home secretary