उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. प्रचाराचा भाग म्हणून ते मंगळवारी कैराना येथे पोहोचले. येथे त्यांनी पळून गेल्यानंतर  परतलेल्या व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच जाहीर सभेला संबोधीत केले. योगी म्हणाले, “कोणत्याही गुन्हेगाराने हिंमत असेल तर लोक पाठवण्यात येतील. पूर्वीच्या सरकारांमध्ये गुन्हेगारांना हेलिकॉप्टरने बोलावून सन्मानित केले जात होते, परंतु आता तसे होत नाही.” दुसरीकडे या सर्व राजकीय गोंधळादरम्यान योगी आदित्यनाथ यांची ज्येष्ठ पत्रकार राहुल कंवल यांची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.

या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आले की, ‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश असूनही हिंदुत्वाचा अजेंडा जबरदस्तीने लादला जात आहे. हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून भारताकडे बघायचे आहे, असे म्हटले जाते. हे योग्य आहे का?’ यावर मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे कारण तो हिंदू बहुसंख्य देश आहे. अखेर भारतापासून वेगळे झालेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये धर्मनिरपेक्षता कुठे मेली? जर कोणाला भारतात धर्मनिरपेक्षता हवी असेल तर त्याने पाकिस्तान आणि बांगलादेशातही त्याचा पुरस्कार केला पाहिजे.’

योगी आदित्यनाथ पुढे म्हणतात, ‘हिंदू असणं ही धर्मनिरपेक्ष असण्याची सर्वात मोठी हमी आहे. मी म्हणतो की, मी स्वत:ला हिंदू सनातन मानतो, तर मला सांगा की मी कोणती चूक करतो? भारतात राहून धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलणे खूप सोपे आहे, अशा लोकांनी पाकिस्तानात जाऊन धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलावे असे मला वाटते.’

रजत शर्मांनीही विचारला होता हिंदुत्वावर प्रश्न..

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी विचारले होते की, ‘भगवे कपडे परिधान करून, भिक्षूचे रूप धारण करून असा द्वेष पसरवणे कितपत योग्य आहे?’ यावर ते म्हणाले, ‘तुम्हाला कोणी मारणार असेल तर आणि समोरचा जर माणूस असेल तर तुम्ही त्याच्या दोन थापडी सहन करू शकता. पण समोर राक्षस असेल तर लगेच त्याच्या एका मारण्याला प्रत्युत्तर द्या. आपण जर हे केले तर त्याचा त्रास होतो, पण दुसर्‍याने केले तर त्यावर चर्चा देखील होत नाही,’ असं त्यांनी म्हटलं होतं.