कुआला लंपूर : वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याने हिंदू आणि चीनच्या नागरिकांबद्दल वांशिक वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर मलेशियातील अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. झाकीर नाईक याला बुकित अमन या द रॉयल मलेशिया पोलीस मुख्यालयात दुसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे बर्नामा या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे. झाकीर हा मुस्लीमबहुल मलेशियाचा कायमस्वरूपी नागरिक असून त्याचा १६ ऑगस्ट रोजी प्रथम जबाब नोंदविण्यात आला होता.

कोटा बारू येथे ३ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चासत्रामध्ये झाकीर नाईक याने मलेशियातील हिंदू आणि मलेशियातील चीनचे नागरिक यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याची तक्रार आहे.