28 October 2020

News Flash

सिम स्वॅपिंग म्हणजे काय? ज्याद्वारे तुमच्या बँकेतील पैसे होऊ शकतात लंपास

सावधान…! सिम स्वॅपिंगने तुमच्या बँकेतील पैसे होऊ शकतात लंपास

एटीएम क्लोनिंग किंवा बँकेतून बोलतोय म्हणून फोन करून माहिती विचारून तुमच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या हॅकर्सनी आता नवी शक्कल शोधली आहे. लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. त्यातच चोरीची आणखी एका पद्धतीनं लोकांच्या बँकेतील पैसे गायब होत आहेत. सिम स्वॅपिंगने तुमच्या बँकेतील पैशावर चोरांची नजर आहे. सिम कार्डचे डुप्लिकेट कार्ड तयार केले जाते. कॉल करणारा आपण सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून कॉल ड्रॉप, इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करीत तुमची माहिती काढून घेतो.

बोलण्यातून ती व्यक्ती युजरचा २० डिजिटचा युनिक नंबर मिळवतो. जो सिम कार्डच्या मागे असतो. त्यानंतर, १ नंबर प्रेस करण्यास सांगितले जाते. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुमच्या सिमचे स्वॅपिंग केले जाते. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर सिग्नल येणे बंद होते व याच नंबरच्या दुसऱ्या सिममध्ये सिग्नल येतात, जे फोन करणाऱ्या व्यक्तीकडे असते. बहुतांश प्रकरणात स्कॅमरकडे आपला बँकिंग आयडी आणि पासवर्ड असतो. आता त्यांना ओटीपीची गरज असते. तो सिम नंबरवर येतो. ओटीपी येताच आपल्या बँक अकाउंटमधून रक्कम ट्रान्सफर केली जाते. युरोप व अमेरिकेत २०१३ मध्ये सिम स्वॅपिंगच्या अनेक घटना घडल्या. सायबर लॉ फाउंडेशनच्या माहितीनुसार २०१८ मध्ये भारतात तब्बल २०० कोटी रुपये या पद्धतीने लंपास करण्यात आले आहे. हा सायबर क्राइमचा प्रकार आहे.

प्रत्येक बँक खात्यात इमेल अलर्ट सुविधा दिली पाहिजे. कारण जर अचानक सिम कार्ड बंद झाले, तर कमीत कमी इमेलच्या माध्यमातून तरी आपल्याला समजू शकते की, आपल्या खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैस काढले आहेत. यामुळे तुम्ही तातडीने बँकेकडे तक्रार करु शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे सिम स्वॅपिंगचे काम जास्त करुन शुक्रवार किंवा शनिवारी केले जाते. काही वेळा सुट्टींमध्येही अशी फसवणूक होते. याचे कारण असे की, सुट्टीच्या दिवशी बँक आणि टेलिकॉम कंपनीला संपर्क साधताना आपल्याला अडचणी येतात. यामुळे तुमचे सिम कार्ड जर बंद झाले तर सावधान राहा आणि तातडीने बँकेचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 3:24 pm

Web Title: beware what is sim swap fraud nck 90
Next Stories
1 १५ ऑगस्ट रोजीच भारताला का मिळालं स्वातंत्र्य… जाणून घ्या कारण
2 Taxpayers Charter आजपासून देशात लागू; जाणून घ्या याचा नक्की काय फायदा होणार
3 तिशीआधीच आरोग्य विमा खरेदी करणं अधिक फायद्याचं; जाणून घ्या ५ कारणं
Just Now!
X