04 December 2020

News Flash

तुमच्या जवळचं करोना चाचणी केंद्र कुठे आहे?; सांगणार गुगलचे ‘हे’ खास फिचर

चार सोप्या स्टेप्स अन् गुगल करणार मदत

प्रातिनिधिक फोटो

दिवसोंदिवस राज्यामधील करोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहेत. मंगळवारी राज्यामध्ये करोनाचे नवे २७०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर मुंबईमधील करोना रुग्णांची संख्याही ९४१ ने वाढली. त्यामुळेच राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या मंगळवारी १ लाख १३ हजार ४४५ वर पोहचली आहे. दिवसोंदिवस वाढत असणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे भितीचे वातवरण आहे. त्यामुळेच आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

“जवळचे अधिकृत कोविड १९ चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि सात प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त गुगल करा,” अशा कॅफ्शनसहीत @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये गुगलच्या मदतीने कशापद्धतीने जवळचं करोना चाचणी केंद्र शोधता येईल यासंदर्भातील माहिती तीन मुद्द्यांसहीत देण्यात आली आहे.

कसे शोधाल जवळचं करोना चाचणी केंद्र?

१) गुगलवर ‘Coronavirus Testing’ किंवा ‘COVID Testing’ या टर्म सर्च करा.

२) हा सर्च रिझल्ट दाखवताना तुम्हाला टेस्टींग नावाचा एक टॅब दिसेल. यामध्ये तुमच्या जवळच्या करोना चाचणी केंद्रांची माहिती आणि इतर महत्वाच्या टीप्स दिलेल्या असतील.

३) या केंद्रांना भेट देण्याआधी भारत सरकराने सुरु केलेल्या 1075 या हेल्प लाइन क्रमांकावर कॉल करा आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन जवळ घेऊन जा.

४) ही सेवा इंग्रजी, हिंदीबरोबरच सात भारतीय प्रदेशिक भाषांमध्ये आहे. यात मराठी, बंगाली, तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती भाषेचा समावेश आहे.

करोनासंदर्भात जनसामान्यांमध्ये भीती असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था तसेच आय़टी क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्या वेगवगेळ्या फिचर्सच्या माध्यमातून पुढाकार घेताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 1:04 pm

Web Title: coronavirus testing you can now just google nearby covid 19 testing centers scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?
2 आत्महत्येचे विचार मनात का येतात?, आपण एखाद्याला आत्महत्या करण्यापासून थांबवू शकतो का?
3 World Blood Donation Day: रक्तगट म्हणजे काय?; रक्तगटाचे फायदे तोटे असतात का?
Just Now!
X