04 August 2020

News Flash

ATM मधून बनावट नोट निघाल्यास घाबरू नका, करा हे काम

आरबीआयचे नियम आणि अटी बँकाना पाळावे लागतात.

या कपातीमुळे MCLR कर्जाचा व्याजदर आता कमी होऊन ६.६५ टक्के राहणार आहे.

बनावट नोटा बनवून त्या बाजारात विविध मार्गे वटवणाऱ्या टोळीने आता थेट बॅंकांमध्येच बनावट नोटा वटवायला सुरूवात केली आहे. एटीएममधून बनावट नोटा निघाल्याच्या तक्रारी देशातील विविध भागातून दररोज होत आहेत. एटीएममधून बनावट नोट निघाल्यास घाबरुन जाऊ नका. अनेकवेळा असे झालेय की एटीएममधून बनावट नोट निघाल्यास त्या व्यक्तीला काय करावं सूचत नाही, तो घाबरून जातो. पण अशावेळी घाबरुन जाऊ नका..

अनेकदा बँक एटीएममधून निघालेली बनावट नोट स्विकारत नाही. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागते. जर तुम्ही अशा अडचणीत सापडला असाल, तर घाबरु नका. कारण रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी काही नियम आणि अटी केल्या आहेत. आरबीआयचे हे नियम आणि अटी बँकाना पाळावे लागतात. आरबीआयच्या नियमांनुसार, एटीएममधून बनावट नोट निघाल्यास  संबंधित बँक जबाबदार असते.

जर एखाद्या ग्राहकाला एटीएममधून बनावट नोट आल्यास बँकेला त्या व्यक्तीला सर्व पैसे परत करावे लागतात. कारण, एटीएममध्ये पैसे टाकताना किंवा भरण्यापूर्वी बनावट नोटा पकडणऱ्या मशीनद्वारे सर्व नोटांची तपासणी केली जाते. त्यानंतरही एटीएममधून बनालट नोटा निघाल्यास त्याला बँक जबाबदार राहते. त्या बनावट नोटांच्या बदल्यात ग्राहकाला बँकेकडून पूर्ण रिफंड मिळतो. त्यासाठी ग्राहकाला बनावट नोट घेऊन बँकेत जमा करावी लागते.

बँकेच्या नियमांनुसार त्या ग्राहकाला पूर्ण पैसे माघारी दिले जातात. बनावट नोट जमा करायला गेल्यानंतर एटीएममधून निघालेली रिसिट बँकेला दाखवावी लागते. त्यासाठी एटीएममधून पैसे काढल्यानंतर रिसिट लगेच फाडू नका किंवा फेकून देऊ नका. रिसिटवरील क्रमांकाच्या आधारे तुम्ही कोणत्या एटीएममधून पैसे काढले ते समजते. त्याशिवाय एटीएममध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यात तात्काळ नोट दाखवा. तोही एक पुरवा मानला जातो. त्यामुळे एटीएममधून बनावट नोट निघाल्यास घाबरुन जाऊ नका. वरील गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे सर्व पैसे तुम्हाला परत मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 1:33 pm

Web Title: do not panic if fake notes come out from atm do this work nck 90
Next Stories
1 World Chocolate Day: कडू पेय ते डेझर्ट… जाणून घ्या हजारो वर्षांचा चॉकलेटचा इतिहास
2 ३१ जुलैपर्यत मुलीच्या नावे उघडा ‘हे’ खातं, २१ व्या वर्षी अकाउंटमध्ये असतील ६४ लाख रुपये
3 Black Death नावाने ओळखला जाणारा ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणं काय?, संसर्ग कसा होतो?; जाणून घ्या
Just Now!
X