दररोज बदलणारे ट्रेंड्स आणि हजारो ट्विट्समुळे माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. पण एखादं ठराविक ट्विट शोधणं म्हणजे ट्विटरवरचं सर्वाधिक किचकट काम. ट्विटरवर हॅशटॅगद्वारे एखाद्या टॉपिकशी निगडीत ट्विट शोधल्यानंतर सहज भेटतात. पण ठराविक एखादं ट्विट शोधायचं असेल तर सर्चमध्ये बराच वेळ शोधाशोध करुनही ते ट्विट सापडत नाही.

ट्विटरकरांची ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. एखादं ट्विट सर्च करण्यासाठी ट्विटरवर सर्च हा पर्याय आधीपासून आहे, त्यात सर्च केल्यास की-वर्डशी निगडीत सजेशन समोर येतात. पण, नेमकं शोधत असलेलं ट्विट सापडत नाही. अशावेळी ट्विटरकडे एडव्हान्स सर्च हा पर्यायही आहे. पण याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे.

‘एडव्हान्स ट्विट सर्च’ नावाचं एक टूल माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरकडे आहे. याचा वापर करण्यासाठी युजर्स twitter.com/search-advanced ही लिंक ब्राउजरवर सर्च करु शकतात. इथे तुम्हाला ट्विट शोधण्यासाठी अनेक फिल्टरचे पर्याय मिळतील. यात तुम्ही एखाद्या की-वर्ड किंवा टर्मचा वापर करुन ट्विट शोधू शकतात. तसंच, इतरांचं किंवा तुमचं एखादं ठराविक ट्विटही तुम्ही इथे सहज आणि सोप्या पद्धतीने शोधू शकतात.

याशिवाय ट्विटर एडव्हान्स सर्चमध्ये तुम्हाला तुम्ही आतापर्यंत केलेले सर्व ट्विट्स डाउनलोड करण्याचाही पर्याय मिळतो. यासाठी प्रोफाइलच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये तुम्हाला Request your archive असा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला इमेलद्वारे तुमचे सर्व ट्विट्स (Twitter archive) पाठवले जातील.