News Flash

घर बसल्या बदला मतदान ओळखपत्रावरील फोटो

मतदान कार्डवर असे करा बदल

How to update photo in voter id card online : मतदान ओळखपत्र कोणत्याही भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचा पुरवा आहे. निवडणुकीत मदतान करण्यासाठी ओळखपत्राचा वापर होतो. त्याशिवाय इतर सरकारी कामाला मतदान ओळखपत्र पुरवा म्हणून वापरलं जातं. आपली ओळख दाखवणाऱ्या या मतदान ओळखपत्रात नेहमी अद्यवत माहिती भरणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही. घरबसल्या ऑनलाइन तुम्ही सर्व बदल करु शकता. मतदान ओळखपत्रावरील फोटो किंवा इतर माहिती बदलण्यासाठी सोप्या पद्धतीचा वापर करावा.

मतदान ओळखपत्रावर फोटो व्यवस्थीत नसल्यास अनेक सराकारी कामं होत नाहीत. सरकारी योजना, बँकिगसह अन्य ठिकाणी ओळखपत्र पुरवा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यावर फोटो व्यवस्थित असल्यास अडचणी कमी येतात.

मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलण्यासाठी नॅशनल वोटर्स सर्विसच्या अधिकृत संकेतस्थळ www.nvsp.in ला भेट द्या. ८ नंबरचा अर्ज पूर्ण भरा. यावर क्लिक केल्यानंतर फोटो बदलण्याचा पर्याय दिसेल. ऑनलाईन चौकशी झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-आईडी मागीतले जाईल. महिनाभराच्या आत तुमच्या फोटोमध्ये बदल होतील.

पत्ता बदलायचा असल्यास काय कराल
www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर correction of entries in electoral roll दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर पत्ता बदलण्याचा पर्याय दिसेल. पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन परवाना, पासपोर्ट यांसारख्या शासकीय कागदपत्रांची छायाप्रत मागितली जाते. अपडेट झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक मागितला जाईल. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर तुमचा नवीन मतदान ओळखपत्र तुमच्या राहत्या घरात पोहोचवला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:53 pm

Web Title: how to update photo in voter id card online through www nvsp in nck 90
Next Stories
1 …तर पाकिस्तानच्या F16 चा खात्मा होणारच, जाणून घ्या ‘राफेल’मधील ‘मिटिऑर’ची वैशिष्ट्ये
2 Kisan Credit Card द्वारे लोन मिळत नसेल तर इथं करा तक्रार, होईल समाधान
3 गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर कसा करतात विम्याचा क्लेम?
Just Now!
X