आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या युएईत सुरु आहे. १९ सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा आता मध्यावधीकडे झुकली आहे. प्रत्येक संघ गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवण्याची धडपड करतो आहे. अनेक संघांनी यंदा अनपेक्षित कामगिरी करत पहिल्या चार स्थानांवर झेप घेतली आहे, तर चेन्नईसारखा दादा संघ यंदा गुणतालिकेत खाली फेकला गेला आहे. आतापर्यंत अनेक गुणवान खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईकर अजिंक्य रहाणे दिल्लीच्या संघात राखीव खेळाडूंच्या बेंचवर बसून असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींमध्ये Mid Season Transfer ची चर्चा सुरु झाली आहे.

क्रीडा जगतात लिग कल्चरमध्ये Mid Season Transfer ही संकल्पना राबवली जाते. एखाद्या स्पर्धेचा हंगाम मध्यावर आल्यानंतर दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या संमतीने खेळाडूला विश्वासात घेऊन खेळाडूंची देवाण-घेवाण करुन शकतात. इंग्लिश प्रिमीअर लिग आणि युरोपियन फुटबॉल स्पर्धांमध्ये अनेक मान्यवर संघ या सुविधेचा फायदा घेत संघात नवीन खेळाडूंना जागा देतात. आयपीएलच्या गेल्या हंगामातही गव्हर्निंग काऊन्सिलने Uncapped Player साठी Mid Season Transfer ची सोय केली होती. पण मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता एकही संघ यासाठी पुढे आला नाही. यंदाच्या हंगामात गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडू भारतीय असो किंवा परदेशी हंगाम मध्यावर आल्यानंतर Mid Season Transfer ची सोय केली आहे.

Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
long distance marriage marathi news, long distance marriage tips
समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…

जाणून घेऊयात काय आहेत Mid Season Transfer चे नियम आणि कोणते खेळाडू ठरू शकतात यासाठी पात्र??

१) कोणताही खेळाडू, मग तो भारतीय असो किंवा परदेशी, आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला असो किंवा न खेळलेला तो Mid Season Transfer साठी उपलब्ध आहे.

२) Mid Season Transfer चा कालावधी सुरु होईपर्यंत जर एखाद्या खेळाडूने दोन पेक्षा जास्त सामने खेळले नसतील अशाच खेळाडूंची देवाण-घेवाण करण्यात येऊ शकते.

३) प्रत्येक संघाने आपले पहिले ७ सामने पूर्ण केल्यानंतरच Mid Season Transfer ची सुविधा देण्यात येईल.

४) Mid Season Transfer मध्ये खेळाडूची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारे पैसे हे ऑक्शन पर्सबाहेरुन द्यावे लागतील.

५) यासाठी दोन्ही संघांचं एकमत आणि खेळाडूची समहती मिळणं गरजेचं आहे.

६) या प्रक्रियेत खेळाडूला त्याची लिलावात ठरवली गेलेली रक्कम मिळेल, याव्यतिरीक्त त्याला कोणताही फायदा होणार नाही.