28 February 2021

News Flash

सैफ करीनानं पहिल्या मुलाचं नाव तैमूर का ठेवलेलं? वाचा त्यांच्याच शब्दांत

तैमूर सोशल मीडियावर कायम चर्चेत

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमनं झालंय. 21 फेब्रुवारीला करिनानने ब्रीज कॅण्डी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमी कळताच सैफिनाच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सैफ करीनाला दुसरा मुलगा झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. सैफ करीना आता दुसऱ्या बाळाचं नाव काय ठेवणार यावरुन नेटकऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा रंगली. तर ट्विटरवरुन अनेकांनी सैफिनाच्या बाळाचं बारसही केलं.

सैफ करीनाचा पहिला मुलगा तैमूर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर तैमूरचे फोटो प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतात. मात्र तैमूरच्या जन्मानंतर त्याच्या नावावरुन मोठा वाद झाला होता. मुलाचं नावं तैमूर ठेवल्यामुळे सैफ करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं.

सैफ करीनाने पहिल्या बाळाचं नावं तैमूर का ठेवलं?
20 डिसेंबर 2016 मध्ये तैमूरचा जन्म झाला. करीना पहिल्यांदा आई झाल्याने नेटकऱ्यांनी भरघोस शुभेच्छा दिल्या. करीना आणि तैमूरचा रुग्णालयातील फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र सैफने मुलाचं नाव तैमूर ठेवताच नेटकऱ्यांनी सैफ आणि करीनाला ट्रोल केलं. भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर तैमूरचं नाव सैफनं मुलाला दिलं असं म्हणत नेटीझन्स चांगलेच संतापले.

‘इंडिया टुडे’ च्या एका कार्यक्रमात करीनाने मुलाचं नाव तैमूर का ठेवलं यावर तिचं मत मांडलं. 2018 मध्ये झालेल्या या कार्यक्रमात करीनाने ट्रोलर्सना उत्तर दिलं. करीना म्हणाली “खूप जणांनी तेव्हा आम्हाला ट्रोल केलं, मात्र तितक्याच लोकांनी आमचं समर्थनही केलं.” ती म्हणाली “रुग्णालयात दाखल होण्याच्या एक रात्र आधी सैफने मला विचारलं होतं की जर मुलगा झाला तर? तरीही तू तूझ्या निर्णयावर ठाम आहेस का? नाहीतर चल बाळाचं नाव बदलू आणि फैज ठेवू. हे नाव खुप रोमॅण्टिक वाटतं. पण मी सरळ नाही म्हंटल. जर मुलगा झाला तर मला माझा मुलगा शूर लढवय्या व्हावा असं वाटतं. तैमूर म्हणजे लोह आणि मी एका लोहपुरुषाला जन्म देतेय. मुलाचं नाव तैमूर ठेवण्याचा मला कायम अभिमान वाटेल. असं करीना या कार्यक्रमात म्हणाली

कॉफी विथ करण कार्यक्रमात सैफ म्हणाला…
कॉफी विथ करण या शोच्या पाचव्या पर्वात सैफ अली खानने तैमूर नाव खुप सुंदर असल्याचं म्हंटलं होतं.”तैमूर म्हणजे लोह आणि हा एक पर्शियन शब्द आहे. लोकांच्या प्रतिक्रिया या अतिशय तीव्र होत्या कारण दिलेलं नाव हे एका निर्दयी सम्राटाचं होतं. तो तीमूर होता जो एक मोगल सम्राट होता. आणि माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. जे कोणत्याही सम्राटाच्या नावाशी संबधित नाही. मला हे नाव आवडलं इतकचं पुरे आहे.” असं सैफ या मुलाखतीत म्हणाला.

सैफच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन; करीनाला दुसऱ्यांदा पुत्ररत्न

करिना आणि सैफने ट्रोलर्सना उत्तर दिलं असलं तरी दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर दोघांनाही पुन्हा ट्रोल केलं गेलं. सैफिना आता मुलाचं नावं बाबर ठेवणार का औरंगजेब अशा शब्दात नेटकऱ्यांनी सैफ करिनावर निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 8:00 pm

Web Title: saif ali khan ang kareena kapoor explains why they named first child name taimur kpw 89
Next Stories
1 समजून घ्या: महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण इतक्या वेगाने का वाढतायत?
2 समजून घ्या : म्यानमारमधील आंदोलनात वापरल्या जणाऱ्या Three Finger Salute चा अर्थ काय?
3 समजून घ्या : टूलकिट म्हणजे काय? ते कशासाठी आणि कसं वापरतात?
Just Now!
X