कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. तसेच फोटो, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतील एक लाख रूपयांपासूनच्या पुढील व्यवहारासाठी पॅनकार्ड सत्कीचे करण्यात आले आहे. महत्वाचं असणाऱ्या या पॅनकार्डवर एक विशिष्ट क्रमांक असतो, ज्याला पॅन क्रमांक म्हटलं जातं. त्या क्रमांकातील प्रत्येक शब्दाचा वेगळा असा अर्थ असतो. आपण आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत…

१) PAN क्रमांकाचा अर्थ समजण्यासाठी सर्वात आधी तुम्ही पॅन कार्ड हातात घ्या आणि व्यवस्थित पाहा. पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी अक्षरानं झालेली असेल.

२) आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पॅन क्रमांकाची सुरुवातीची तीन अक्षरं अल्फाबेटिक सीरीजमध्ये असतील. AAA पासून ते ZZZ तक पर्यंत कोणतीही असू शकतात. ही अक्षरं आयकर विभाग ठरवते.

३) पॅन क्रमांकावरील चौथं अक्षर पॅन कार्डधारकंचं स्टेट्स दाखवलं. जर चौथं अक्षर P असेल तर हे पॅन कार्ड पर्सनल आहे. जर F असेल तर फर्म आहे. C असेल तर कंपनी, AOP असेल असोसिएशन ऑफ पर्सन, T असेल ट्रस्ट, B असेल तर बॉडी ऑफ इंडिविजुअल असा अर्थ दाखवतो. चौथ्या क्रमांकावरील अक्षर पॅन कार्ड वापरणाऱ्याची स्थिती दर्शवते.

४) पॅनमधील पाचवं अक्षर वापरकर्त्यांच्या आडनावातील पहिलं अक्षर असते. जसं की, वापरकरत्याचं आडनाव खुराणा किंवा खारे असेल तर पॅन कार्डवरील पाचवं डिजिट K असेल.

५) आडनावाच्या अक्षरानंतर चार क्रमांक असतील. 00001 पासून 9999 पर्यंत कोणतेही चार क्रमांक असतील. पॅन कार्ड देतेना सुरु असलेल्या सिरिजनुसार आयकरविभाग चार क्रमांक प्रविष्ट करते.

६) पॅन कार्डचा दहाव्या क्रमांकावरही इंग्रजी अक्षर असतं. ते अल्फाबेट चेक डिजिट क्रमांक दर्शवते.