फेसबुकने नुकतीच मेसेंजर रुमचे फिचर लॉन्च केलं आहे. झूम आणि गुगल मीटला टक्कर देण्यासाठी फेसबुकने हे फिचर आणल्याचं सांगितलं जात आहे. हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध असून लवकरच व्हॉट्सअ‍ॅप वरुन हे फिचर वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. थेट व्हॉट्सअ‍ॅपवरुन तुमच्या फेसबुक फ्रेण्ड लिस्टमधील लोकांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. अनेक बीट व्हर्जनमध्ये यासंदर्भातील पर्याय युझर्सला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लवकरच सर्वांसाठी हा पर्याय देण्यात येणार असल्याचे समजते.

व्हॉट्सअ‍ॅपमध्येच मेसेंजर चॅटरुमचा शॉर्टकट असेल. तो निवडल्यास युझर्स व्हॉट्सअ‍ॅपवरुन थेट मेसेंजर अ‍ॅप किंवा मेसेंजर वेब ब्राउझरवर जातील. मात्र ही सुविधा वापरण्यासाठी फेसबुक अकाउंट असणं गरजेचे आहे. या माध्यमातून होणारे कॉल हे व्हॉट्सअ‍ॅप कॉलप्रमाणे एण्ड टू एण्ड इनस्क्रीप्टेड नसतील.

कसं वापरायचं हे फिचर

मेसेंजर रुम शॉर्ट कट व्हॉट्सअ‍ॅपवरुन वापरण्यासाठी अ‍ॅण्ड्राइड, आयफोन आणि डेक्सटॉपमध्ये जवळजवळ सारखेच पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरुन वापरण्यासाठीच्या स्टेप्स खालील प्रमाणे…

१)
मेसेंजर रुमवरुन संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सुरु करा.

२)
त्यामधील कॉल टॅबमध्ये क्रिएट रुमचा पर्याय निवडा.

WhatsApp > go to Calls tab > Create a room

३)
व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेसेंजर चॅटरुमवर जाताना तुम्हाला ‘कंटीन्यू इन मेसेंजर’ची पॉपअप विंडो दिसेल त्यावर ओके क्लिक करा.

४)
ओके क्लिक केल्यावर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन थेट मेसेंजर अ‍ॅपवर जाल.

५)
तिथे तुम्ही या चॅटरुमला नाव देऊन त्या चॅटरुमची लिंक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्याचा पर्याया दिसेल

६)
या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये याल. इथे ग्रुपवर लिंक शेअर करुन तुम्ही मित्रांना कॉलमध्ये जॉइन होण्यासाठी बोलवू शकता.

७)
हे फिचर वापरण्यासाठी मेसेंजर अ‍ॅप अपडेट असणं आणि फेसबुक अकाउंट लॉगइन असणं गरजेचे आहे.

८)
तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबरची चॅट विंडो ओपन करुन व्हिडिओ कॉल करु शकता. यासाठी ग्रुप चॅट वरुन ही सुविधा उपलब्ध आहे. तेथे तुम्हाला ग्रुप कॉलच्या बटणवरुन व्हिडिओ कॉल करता येईल.

Attach > Room or open a group chat > Group call icon > Create a room

(Image: Facebook)

आयफोन आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुन

आयफोनवरुन आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुनही अशाच पद्धतीने मेसेंजर चॅटरुमवरुन व्हिडिओ कॉल करता येईल. मेन्यू किंवा ड्राप डाऊन किंवा तीन डॉट दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘क्रिएट अ रुम’चा पर्याय दिसेल. तुम्ही यामधील अटॅच पर्यायावर क्लिक करुन रुम ऑप्शनमधून एखाद्या व्यक्तीशी किंवा ग्रुपशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधू शकता. यामध्ये तुमचे कॉल व्हॉटसअ‍ॅपच्या ब्राउजरमध्ये न होता मेसेंजरच्या ब्राउजरवर होतात.