Air India flight cancel: १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये एक प्रवासी सोडून इतर सर्व प्रवाशांचा तसंच विमानातील क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. शिवाय हे विमान ज्या हॉस्टेलवर आदळले तिथल्या ३३ जणांचाही या अपघाता मृत्यू झाला. या अपघातानंतर एअर इंडिया विमान कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. १२ जूनला अपघात झाल्यानंतर १७ जून रोजीदेखील काही विमानांची उड्डाणे तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली हेती. त्यानंतर एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे १५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे कंपनीने विविध कारणे सांगितली आहेत. त्यानंतर एअर इंडियाने आणखी एक मोठा निर्णय घेत जवळपास १९ मार्गांवरील विशेष विमानांची सेवा कमी करणार असल्याचे सांगितले आहे.

एअर इंडियाने म्हटले आहे की १९ मार्गांवर नॅरो-बॉडी विमानांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सध्या तीन मार्गांवर उड्डाण थांबवले आहे. या बदलांचा परिणाम त्यांच्या एकूण नॅरो-बॉडी सेवांपैकी सुमारे पाच टक्के सेवांवर होईल. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अपघातानंतर कंपनीला काही अडथळे येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन्स कपातीमुळे कोणत्या मार्गांवर परिणाम होईल आणि जर प्रवाशांची फ्लाइट रद्द झाली तर ते काय करू शकतात हे जाणून घेऊ…

नॅरो-बॉडी फ्लाइट्स कमी केल्यामुळे नेमका कोणत्या मार्गांवर परिणाम होईल हे जाणून घेऊ. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर स्थिर ऑपरेशन्स राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एअर इंडिया १९ देशांतर्गत मार्गांवरील फ्लाइट्स तात्पुरत्या कमी करत आहे आणि तीन मार्गांवरील सेवा स्थगित करत आहे, दोन आंतरराष्ट्रीय आणि एक देशांतर्गत सेवा स्थगित करत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. हे बदल एअरलाइन्सच्या एकूण नॅरो-बॉडी फ्लाइट्सच्या सुमारे पाच टक्के आहेत.

कोणते आहेत हे १९ मार्ग?

मुंबई-वाराणसी – दर आठवड्याला १२ ते ७
मुंबई-हैदराबाद – दर आठवड्याला ६३ ते ५९
मुंबई-गोवा (दाबोली) – दर आठवड्याला ३४ ते २९
मुंबई-कोची – दर आठवड्याला ४० ते ३४
मुंबई-कोईम्बतूर – दर आठवड्याला २१ ते १६
मुंबई-कोलकाता – दर आठवड्याला ४२ ते ३०
मुंबई-बंगळुरू – दर आठवड्याला ९१ ते ८४
मुंबई-अहमदाबाद – दर आठवड्याला ४१ ते ३७
दिल्ली-पुणे – दर आठवड्याला ५९ ते ५४
दिल्ली-लखनऊ – दर आठवड्याला २८ ते २१
दिल्ली-इंदोर – दर आठवड्याला २१ ते १४
दिल्ली-हैदराबाद – दर आठवड्याला ८४ ते ७६
दिल्ली-गोवा (मोपा) – दर आठवड्याला १४ ते ७
दिल्ली-गोवा (दाबोलिम) – दर आठवड्याला १४ ते ७
दिल्ली-कोईम्बतूर – दर आठवड्याला १३ ते १२
दिल्ली-मुंबई – दर आठवड्याला १७६ ते १६५
दिल्ली-बंगळुरू – दर आठवड्याला ११६ ते ११३
बंगळुरू-चंदीगड – दर आठवड्याला १४ ऐवजी ७ पर्यंत कमी केले

निलंबित मार्गांमध्ये खालील मार्गांवर प्रत्येकी सात आठवड्याच्या उड्डाणांचा समावेश आहे. हे किमान १५ जुलैपर्यंत थांबवण्यात आले आहे.
मुंबई-बागडोगरा (एआय५५१/५५२)
पुणे-सिंगापूर (एआय२१११ २११०)
बंगळुरू-सिंगापूर (एआय २३९२ २३९३)

कपातीचा हा निर्णय तात्पुरता असूनही एअर इंडिया १२० देशांतर्गत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर नॅरो-बॉडी विमानांसह दररोज सुमारे ६०० उड्डाणे चालवत राहील असेही या निवेदनात म्हटले आहे. शिवाय ही कपात एकूण ऑपरेशनल स्थिरता सुधारण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी रद्द होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आहे.

तुमची फ्लाइट रद्द झाल्यास काय करावे?

एअर इंडियाने म्हटले आहे की, ते उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रभावित प्रवाशांशी संपर्क साधत आहेत. जेणेकरून त्यांना त्यांच्या पसंतीनुसार पर्यायी उड्डाणे, मोफत रिशेड्यूल किंवा पूर्ण परतावा असे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. सुधारित वेळपत्रक कंपनीच्या संकेतस्थळावर, मोबाइल अॅप आणि आमच्या संप्रक केंद्रावद्वारे हळूहळू उपलब्ध करून दिले जात आहे. आम्ही आमचे वेळापत्रक शक्य तितक्या लवकर पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच नेहमीच आमच्या प्रवाशांच्या, क्रू आणि विमानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आहोत”, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

फ्लाइट रद्द केल्यावर परतावा कसा मिळणार हे पाहायचे असल्यास काय करू शकता?

पहिली पायरी https://www.airindia.com/in/en/contact-us/customer-support-portal/refunds.html हे संकेतस्थळ पहा.
दुसरी पायरी या संकेतस्थळावर स्टेटस चेक किंवा पेंडिंग रिफंड यावर क्लिक करा
तिसरी पायरी तुमची माहिती फॉर्ममध्ये भरा आणि तो सबमिट करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदाबाद विमान अपघातानंतर देशांतर्गत उड्डाणांसाठी बुकिंगमध्ये जवळपास २० टक्क्यांनी घट झाली आहे. भाडे ८ ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे असे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष रवी गोसाई यांनी सांगितले. १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. मेघानी नगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमधील एका वसतिगृहाच्या इमारतीवर ते धडकले. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा तर जिथे कोसळले तिथल्या ३३ जणांचा मृत्यू झाला होता.