तुम्ही आयुष्यमान भारत योजनेत येता का? असं पाहा तुमचं स्टेट्स

प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Ayushman Bharat- Pradhan Mantri Jan Arogya Yojna : केंद्र सरकारची महत्वांक्षी योजना आयुष्मान भारत एक एप्रिल २०१८ पासून देशभरात लागू करण्यात आली आहे. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएलधारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेचा १० कोटी बीपीएलधारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशात आताप्रर्यंत सात लाख ५६ हजार लोकांना ई-कार्डाची सुविधा मिळाली आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्येही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात या योजनेअंर्गत मोफत उपचार करू शकतात. तुमचं कुटुंब या योजनेसाठी पात्र असल्यास लवकरच CSC केंद्रात जाऊन या योजनेचं ई-कार्ड घ्या.

आणखी वाचा- आनंदवार्ता! आठवड्याभरात बदलणार पेन्शनचे नियम, खात्यात जमा होणार जास्त रक्कम

तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्याचं स्टेटस तुम्हाला माहित नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. सोप्या स्टेप्सद्वारे आम्ही याची माहिती तुम्हाला देणार आहोत. सध्या करोनाच्या प्रदुर्भावामुळे तुम्ही घरीच बसून राहा आणि तुमची कामं करून घ्या. जाणून घेऊयात आयुष्यमान भारत योजनचं स्टेटस आणि तुम्ही त्यास पात्र आहात का हे पाहण्याच्या सोप्या स्टेप्स…

https://www.pmjay.gov.in/ या वेबपेजला भेट द्या…

– पेजवर गेल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात वर Am I eligible या पर्यायावर क्लिक करा.

– नवीन पेज ओपन होईल. तुम्हाला मोबाइल क्रमांक मागितला जाईल.

– मोबाइल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि Generate OTP वर क्लिक करा.

– तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून डेटा पॉलिसी तपासा.

– या सर्व प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल.

– Select State या पर्यायावरून तुम्ही राज्याची निवड करा.

– त्यानंतर कॅटेगरीची निवड करा. पुन्हा HHD नंबर, रेशनकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर टाका. ज्याआधारे तुम्हाला तुम्ही आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र आहात का किंवा या योजनेचं स्टेटस समजेल.

आयुष्मान भारत योजना ऑनलाईन नोंदणी वेबसाइट –
आयुष्मान भारत योजनेसाठी कोणतीही कर नोंदणी नाही. या योजनेनुसार ज्यांची नावे सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या यादी (एसईसीसी 2011) मध्ये नोंदविली गेली आहेत. केवळ ह्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असल्यास आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास. तो स्वत:चे नाव शासनाने केलेल्या अधिकृत शासकीय किंवा खासगी रुग्णालयात नोंदणी करू शकतो. याशिवाय आयुष्मान मित्राचीही मदत घेता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ayushman bharat yojna pradhan mantri jan arogya yojna check status ayushman bharat yojna nck

ताज्या बातम्या