CNG Filling : सध्या वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतींमुळे सीएनजी कारला लोकांची पहिली पसंती दिली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चांगले मायलेज आणि कमी खर्च, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव घेता येतो. परंतु, सीएनजी कार वापरताना त्या संबंधित काही विशेष माहिती आणि सुरक्षा नियमदेखील माहीत असणे आवश्यक आहे. अनेकदा सीएनजी कारने प्रवास करताना लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी एका छोट्या चुकीमुळे अपघात किंवा नुकसान होण्याचा धोका वाढतो. कारमध्ये सीएनजी गॅस भरताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. दरम्यान, पंपावर कारमध्ये सीएनजी भरताना आतील प्रवाशांना कारमधून खाली उतरण्यास का सांगितले जाते? याविषी तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आजच जाणून घ्या.

सीएनजी कार वापरताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयीदेखील सविस्तर जाणून घेऊ…

सीएनजी भरताना गाडीतून बाहेर उतरण्यास का सांगितले जाते?

जेव्हा तुम्ही कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी पंपावर पोहोचता तेव्हा सर्व लोकांना गाडीतून बाहेर पडण्यास सांगितले जाते. कारण सीएनजी भरताना पाईपमध्ये २०० ते २५० बारचा दाब असतो. या उच्च दाबामुळे कारमध्ये जास्त दाब येऊ शकतो, ज्यामुळे इंधनाची टाकी किंवा पाईपमध्ये क्रॅक किंवा गळती होऊ शकते. अशाने आगीची घटना घडू शकते, त्यामुळे सुरक्षिततेसाठी कारमधून बाहेर पडणं सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असते.

१) गॅस गळतीपासून संरक्षण

सिलिंडरमध्ये सीएनजी गॅस उच्च दाबाने भरला जातो. जर या काळात गॅस गळती झाली तर ते धोकादायक ठरू शकते. गॅस गळतीमुळे आग किंवा स्फोट होऊ शकतो, म्हणून सीएनजी भरताना कारपासून दूर उभे राहा आणि काळजी घ्या. कारण अशावेळी कारमध्ये बसण्यापेक्षा बाहेर उभे राहिल्यास अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

२) मीटरचे निरीक्षण करा

सीएनजी कारचे मीटर पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा वेगळे असते, म्हणून जेव्हा तुम्ही कारमध्ये सीएनजी गॅस भरता, तेव्हा मीटर योग्यरित्या काम करत आहे की नाही, गॅसचे प्रमाण योग्य मापले जात आहे की नाही याची खात्री करा; यामुळे तुम्ही गॅस ओव्हरफिलिंग टाळू शकता आणि योग्य मायलेजसह कार चालवू शकता.

४) गॅसचा वास आणि आरोग्य समस्या

काही लोकांना सीएनजी गॅसच्या वासामुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळ जाणवू शकते. जर तुम्हालाही अशी कोणती समस्या जाणवत असेल तर गॅस भरताना कारच्या बाहेर मोकळ्या वातावरणात उभे राहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) ओव्हरफिलिंग टाळा

सीएनजी टाकी जास्त भरणे खूप धोकादायक ठरू शकते, यामुळे टाकीच्या आत दाब वाढतो आणि गळती किंवा फुटण्याचा धोका असतो; म्हणून गॅस भरताना नेहमी टाकीमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त गॅस भरू नये.