आज दिवाळीचा पहिला दिवस. दारात रांगोळी, कंदील, दरवाजाला तोरण, पणत्या आणि पहिली अंघोळ या सर्व गोष्टींमुळे दिवाळी अगदीच खास होऊन जाते. तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधित उटण्याने पहिली अंघोळ केली जाते. तर अभ्यंगस्नान म्हणजे काय ? दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेल आणि उटणं का लावले जाते? हे आज आपण बघणार आहोत. लोकसत्ता. कॉमशी बोलताना ‘वैद्य विनायक खडीवाले’ या आयुर्वेदिक तज्ज्ञांनी याविषयी काही खास माहिती सांगितली आहे ती पाहूयात…

अभ्यंगस्नान म्हणजे काय ?

29 April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
२९ एप्रिल पंचांग: शुक्राच्या नक्षत्रात सोमवार होणार वैभवदायी; आज लक्ष्मी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना देणार बक्कळ लाभ
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व

अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करणे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. तेल जर तुम्ही नियमित अंगाला लावलं तर शरीराची झीज भरून निघते, शरीर आणि मन निर्मळ राहते तसेच तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते, मन प्रसन्न राहते, कामात चांगली गती मिळते. या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात रोग होण्याचे कोणतेही कारण उरत नाही, म्हणून अभ्यंगस्नानाचे विशेष महत्व आहे.

त्वचेला उटणं लावण्याचे काय आहे महत्त्व :

आयुर्वेदामध्ये उटण्याला ‘उद्वर्तन’ असे म्हणतात. ज्याचा संस्कृत अर्थ : ‘उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलापनम्।’ असा आहे. उटणं लावल्यावर त्वचेवाटे तुमच्या शरीरातला कफ, दोष निघून जातात आणि शरीर स्वच्छ आणि निर्मळ होतं. दिवसभर उत्साही वातावरण, त्वचेचे मोठे आजार आदी गोष्टींकरिता अभ्यंग तेल आणि मुख्य म्हणजे उटणं लावणे महत्त्वाचे आहे, हे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे.

आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या यांना फार महत्त्व दिले आहे. दिनचर्येमध्ये सगळ्यांनीच सकाळी लवकर उठून नियमित अंगाला अभ्यंग तेल लावले पाहिजे.ज्याच्यामध्ये शतावली, बला, उद्विगत गुणांच्या श्रेष्ठ वनौषधींचा समावेश असतो. तिळाचं तेल जर किंचित कोमट करून ते जर अंगाला लावलं किंवा मसाज केला आणि त्याच्याबरोबर हे उटणं लावलं, तर तुमच्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी अगदीच उत्तम ठरते.

म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी केली जाते तेल आणि उटणं लावून अंघोळ :

उटण्याला “हेमांगी उटणं” असेदेखील म्हणतात. हेम म्हणजे सुवर्ण. सुवर्णासारखी शरीराला शांती देणारं आणि मन स्वच्छ करणारं, मनात चांगले विचार आणणारं तसेच शरीरात कोणत्याही प्रकारचे रोग तुम्हाला होणार नाहीत याकरिता तुम्ही साबणाच्या जागी हे सुगंधित उटणं अंगाला लावा. उटण्यामुळे शरीर दिवसभर प्रसन्न राहतं, कुठलाही त्वचेचा रोग तुम्हाला होत नाही; असे फायदे अभ्यंग तेल आणि मुख्य म्हणजे उटणं लावण्याने होतात आणि मुख्य म्हणजे, हे जर तुम्ही नियमितपणे केलं, तर तुमचं म्हातारपणही दूर राहते. म्हणून नरक चतुर्दशीची सुरुवात अभ्यंग तेल आणि महत्त्वाची गोष्ट उटणं लावून केली तर सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळते, असे वैद्य विनायक खडीवाले यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा…ब्लेडच्या मध्यभागी मोकळी जागा का असते? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण…

उटण्यामध्ये कोणत्या वनौषधींचा उपयोग केला जातो हे पाहूयात :

दोष, कफ यांना जिंकून शरीर छान राहणं यांच्याकरिता आयुर्वेदामध्ये उटण्याचा वापर करावा असे सांगण्यात येते. उटण्यात अनंत मूळ, उपलसरी नावाची वनस्पती, वाळा, चंदन, अर्जुन चाल, या सगळ्याबरोबर मनाला आनंद मिळावा म्हणून गुलाब कळी अशा सगळ्या सुंदर, सुगंधी वासाच्या वनौषधी या उटण्यामध्ये वापरल्या जातात.

टीप :

१. ज्यांची त्वचा रुक्ष आहे, त्यांनी उटणं दुधामधून लावणे.
२. ज्यांची त्वचा स्निग्ध (Oily) आहे, त्यांनी पाण्यातून उटणं लावणे.
३. आणि जर उन्हाळ्यात तुम्ही उटणं लावणार असाल, तर हे उटणं तुम्ही गुलाब पाण्यातूनसुद्धा लावू शकता.