Cockroach Farming : जगात अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या आपल्याला अचंबित करणाऱ्या असतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची माणसे राहतात. राहणीमानापासून खानपानापर्यंतच्या सर्व सवयी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. काही लोक शाकाहारी असतात; तर काही लोक मांसाहारी असतात. काही लोक असे खाद्यपदार्थ खातात; ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. पण, तुम्ही कधी झुरळांच्या शेतीविषयी वाचले आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

झुरळांची शेती

झुरळांची शेती ही त्याप्रमाणेच असते, जशी आपण कोंबडी आणि अंड्यांची शेती करतो. मधासाठी मधमाश्यांची शेती करतो, त्याप्रमाणे झुरळांची शेती केली जाते. या शेतीद्वारे झुरळांचे उत्पादन मोठ्या संख्येने वाढवले जाते.

कशी केली जाते झुरळांची शेती?

झुरळांच्या शेतीविषयी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. कदाचित भारतीय लोकांसाठी ही अचंबित करणारी गोष्ट असू शकते; पण चिनी व्यक्तींसाठी नाही. चीनचे लोक झुरळांच्या शेतीतून मोठा नफा कमावतात. भारतात जसे मासे, कोंबड्या व मधमाश्यांचे पालन केले जाते, त्याचप्रमाणे चीनमध्ये झुरळांची शेती केली जाते वा झुरळांचे पालन केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झुरळांचे केले जाते सेवन

चीनमध्ये झुरळांना प्रोटिनचा मुख्य स्रोत मानला जातो. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने झुरळे पाळली जातात. एवढेच काय, तर चिनी लोक स्नॅक्स किंवा साइड डिश म्हणून झुरळांना शिजवून खातात.
चीनमध्ये असे अनेक विचित्र खाद्यपदार्थ आहेत की, ज्यावरून अनेकदा चीनला ट्रोलही करण्यात आले आहे. अशात येथे झुरळांची शेती करणे ही एक सामान्य गोष्ट आहे.