व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणेच प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयीतही आपल्याला वैविध्य आढळतं. सर्वसाधारणपणे आपल्याकडे शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन प्रकारात मोडणारी माणसं पाहायला मिळतात. त्यातूनही Vegan आणि Eggeterian हे प्रकारही आता समोर आले आहेत. जी लोक मांसाहारच नव्हे तर एखाद्या प्राण्यापासून मिळणाऱ्या पदार्थाचं जसं की डेयरी प्रॉडक्टचंही सेवन करत नाही अशा लोकांना Vegan म्हणतात, तर Eggeterian म्हणजे ती लोक जी इतर मांसाहर न करता फक्त अंड्याचं सेवन करतात.
आता इथे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अंडं हे शाकाहारात मोडते की मांसाहारात? जसा कोंबडी आधी की अंडं या प्रश्नावर आजही प्रचंड चर्चा रंगते तसंच अंडं शाकाहारी की मांसाहारी यावरही बऱ्याच चर्चा झडतात. अंड्यातून पिलू बाहेर येतं म्हणून काही मंडळी त्याला मांसहारात मोडतात तर काही लोक गाईपासून मिळणारी दूध शाकाहारी तर मग अंड्याने काय पाप केलं? असा युक्तिवाद करतात.
आपल्यापैकी कित्येक लोक ऑम्लेट, भुर्जीपासून चायनीज नूडल्समध्येही अगदी ताव मारून अंड्याचा आस्वाद घेतो, पण खरंच हा विचार आपण कधी केला आहे का की अंडं नेमकं शाकाहारी की मांसाहारी? नुकतंच वैज्ञानिकांनी या प्रश्नाचं एक समाधानकारक उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे.
प्रामुख्याने कोंबडी कोणत्याही कोंबड्याचा संपर्कात न येताही एक ते दीड दिवसाच्या कालावधीत अंडी देऊ शकते. त्यामुळे कोंबडयाच्या संपर्कात न येता कोंबडीने दिलेली अंड्यातून पिलू बाहेर येत नाही. याच अंड्यांना ‘अनफर्टिलाइज्ड एग्स’म्हणतात आणि ही अंडी शाकाहारी असल्याचा दावाही काही वैज्ञानिकांनी केलेला आहे. इतकंच नव्हे तर बाजारात मिळणारी अंडी ही याच प्रकारात मोडणारी अंडी असतात, शिवाय ही अंडी poetry farm मधून आणली जातात त्यामुळे बहुतेककरून ती अंडी अनफर्टिलाइज्ड असतात.
आणखी वाचा : येथे मुली घेतात चक्क हुंडा, कारण वाचाल तर थक्क व्हाल; जाणून घ्या काय आहे ही अजब-गजब प्रथा!
तर कोंबडी कोंबड्याच्या संपर्कात येऊन जी अंडी देते त्यांना मांसाहारी मानलं जातं. या अंड्यांमध्ये गॅमीट सेल्स असल्याने त्यातून पिलू बाहेर येण्याची शक्यता असते. शिवाय या अंड्यातील पिवळा भाग हा मांसाहारी मानला जातो. त्यामुळे कोंबडी आधी का अंडं या प्रश्नाप्रमाणेच अंडं शाकाहारी की मांसाहारी असा प्रश्न कुणी विचारलाच तर यावर आपण हे उत्तम हमखास देऊ शकतो.