झोप कुणाला प्रिय नाही? माणसापासून ते जवळपास सर्व पक्षी, प्राणी हे शरीर आणि मेंदूला आराम देण्यासाठी पुरेशी झोप घेत असतात. मात्र, पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी, खासकरून मासे हे झोपतात का? असे कुतूहल कधी कधी आपल्याला माशांच्या दुकानात गेल्यावर काचेच्या टँकमध्ये ठेवलेल्या माशांकडे बघून निर्माण होते. आज आपण याच रंजक विषयाची माहिती पाहणार आहोत.

मासे झोपतात की नाही जे जाणून घेणे खरे तर खूप अवघड काम आहे. माशांची विशिष्ट शरीररचना आणि त्यांच्या चेहऱ्यावर फारसे हावभाव नसणे यामुळे त्यांची देहबोली समजणे फारच अवघड असते.

Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
IND vs CAN Match abandoned Due to Wet Outfield
IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण
paytm layoff
Paytm Layoff : अन् कर्मचारी ढसाढसा रडत म्हणाला, “हवं तर मी कमी पगारावर काम करेन”, पुढे काय झालं?
What Bhujbal Said About Raj Thackeray ?
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

विशेषतः माशांच्या डोळ्यांवर पापण्या नसल्यानेही पाण्यातील मासे जागे आहेत की झोपलेले आहेत हे समजणे मुश्कील होते. मग हे मासे नक्की झोपतात की नाही?

हेही वाचा : शाही स्वयंपाक करणाऱ्या ‘शेफ’ला पूर्वीच्या काळी ‘महाराज’ का म्हटले जायचे? जाणून घ्या ही माहिती

मासे झोपतात का?

बहुतेक मासे हे नियमितपणे एका निष्क्रिय स्थितीत जातात; ज्यात ते झोपल्यासारखे दिसतात. अशी स्थिती दीर्घकाळ किंवा दिवसभरात तुकड्या-तुकड्यांमध्ये आणि रात्रीच्या वेळेस वरचेवर घडू शकते.

काही मासे तळाशी जाऊन झोप घेऊ शकतात किंवा निष्क्रियपणे पाण्यात पोहत राहू शकतात. डॅमसेल्फिश प्रवाळांच्या फांद्यांमध्ये आराम करतात; तर, वेल्स कॅटफिश पाण्यातील वनस्पतींमध्ये स्थिरावतात. पॅरेट मासे हे रात्रीच्या वेळी आराम करतात आणि आराम करत असताना स्वतःचे परजीवींपासून रक्षण करण्यासाठी स्वतःभोवती श्लेष्मलाचे आवरण तयार करतात.

मात्र, असे असले तरीही हे सिद्ध होत नाही की, मासे खरंच झोपतात. कदाचित अंधारामध्ये अन्न खाणे किंवा संवाद साधणे शक्य नसल्याने इतर काही करण्यापेक्षा हे मासे निष्क्रिय राहून त्यांच्या ऊर्जेची बचत करीत असतील, असादेखील या सर्व क्रियांचा अर्थ असू शकतो. असे बीबीसीच्या डिस्कव्हर वाइल्ड लाइफच्या एका लेखावरून समजते. असे असले तरीही झोप घेणाऱ्या, इतर सरपटणाऱ्या व सस्तन प्राणी आणि पक्ष्यांप्रमाणेच मासेदेखील निष्क्रिय स्थितीत असताना सभोवताली घडणाऱ्या हालचालींना कमी आणि उशिराने प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ- त्यांना खाऊ घातल्यास ते इतर वेळेपेक्षा कमी गतीने प्रतिसाद देतात.

परंतु, माशालादेखील झोपेची आवश्यकता असल्याचे काही पुरावे असून, मासे, करण्यासाठी काही नसते तेव्हा केवळ वेळ घालवण्यासाठी म्हणून निष्क्रिय स्थितीत जात असतील या तर्काला विरोध करतात. उदाहरणार्थ- सिच्लिड माशाच्या निष्क्रिय स्थितीत व्यत्यय आणल्यास, तो मासा दुसऱ्या दिवशी कमी सक्रिय राहतो. तसेच, झेब्रा फिशदेखील काही लक्षणS दाखवतो. झेब्रा फिश अशा वेळेस संधी मिळताच त्याच्या निष्क्रिय स्थितीची भरपाई करून, ‘स्लीप डिपर्व्हेशन’ला प्रतिसाद देत असतो.

हेही वाचा : तुम्ही कधी ‘चायनीज काली’ मंदिराबद्दल ऐकलंय का? पाहा, इथे प्रसाद म्हणून देतात नूडल्स अन् चाऊमिन!

झोपेचे नैसर्गिक चक्र जरी फारसे समजत नसले तरीही ती दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींच्या, अनुभवांच्या आठवणी या स्मृतीमध्ये एकत्रितपणे साठवून ठेवण्यासाठी फार महत्त्वाची असल्याचे समजते. त्यावरूनच कदाचित, महासागरामध्ये असणाऱ्या काही स्कुलिंग फिश प्रजाती का झोपत नसतील हे समजण्यास मदत होऊ शकते.

जसे की, महासागरातील मॅकरेल आणि ट्युना मासे हे जर झोपी गेले, तर त्यांना समूहापासून वेगळे होण्याचा धोका असतो. डॉल्फिन माशाप्रमाणेच हे मासेदेखील अर्धा मेंदू जागा ठेवून झोप घेत असतात. मात्र, असे असले तरीही महासागरातील जीवन हे फारसे रंजक किंवा मजेशीर ठिकाण नसल्याने माशाच्या मेंदूमध्ये अनुभव साठवण्याची प्रक्रिया करण्यासाठी काहीच नसेल, असेही असू शकते.

माशामध्ये निद्रानाश असणे हा एक दुर्मीळ अपवाद आहे. हेच मासे हे प्राचीन व्हर्टेब्रेट स्लीपचे [vertebrate sleep] मूळ असल्याचे सूचित करते. असे असतानाही अजून एक मोठा फरक समोर येतो. तो म्हणजे मासे REM स्लीपचा अनुभव घेतात, असे सांगणारे खूपच कमी पुरावे आहेत. सस्तन प्राणी, पक्षी यांमध्ये जलद गतीने डोळ्यांची हालचाल होणे [rapid eye movements – REM], स्नायूंची हालचाल होणे या बाबी सामान्य असून, त्याला आपण मानवांमधील स्वप्न पाहण्याची स्थिती म्हणतो. अशी झोपण्याची विशिष्ट पद्धत किंवा स्थिती ही कदाचित ४५० दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा व्हर्टेब्रेटचे माशातून उभयचरामध्ये रूपांतर झाले तेव्हा निर्माण झाली असावी, अशी माहिती बीबीसीच्या डिस्कव्हर वाइल्ड लाइफच्या एका लेखावरून समजते.