कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) अलीकडेच आयएएस (कॅडर) नियम, १९५४ मध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. याची अंमलबजावणी झाल्यास, राज्य सरकारांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आयएएस अधिकाऱ्यांची केंद्राची मागणी रद्द करता येणार नाही. या प्रस्तावामागे डीओपीटीचा तर्क असा आहे की राज्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी पुरेसे आयएएस अधिकारी पाठवत नाहीत, ज्यामुळे केंद्र सरकारच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे, बिगर-भाजपा शासित राज्यांचे म्हणणे आहे की यामुळे देशाच्या संघीय रचनेला हानी पोहोचेल आणि केंद्र आणि राज्यांमधील संबंधांमध्ये तणाव वाढेल. डीओपीटीचे म्हणणे आहे की केंद्रातील सहसचिव स्तरापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांचे प्रतिनिधीत्व कमी होत असल्याचे दिसून आले आहे, कारण बहुतेक राज्ये त्यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्ती राखीव (सीडीआर) जबाबदाऱ्या आणि उमेदवारांची संख्या पूर्ण करत नाहीत. केंद्रात सेवा देण्यासाठी त्यांनी पुरस्कृत केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. डीओपीटीच्या सूत्रांनुसार, सीडीआरवर आयएएस अधिकाऱ्यांची संख्या २०११ मध्ये ३०९ वरून २२३ वर आली आहे.

केंद्राची गरज भागवण्यासाठी बदल

सीडीआर वापराची टक्केवारी २०११ मधील २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आली आहे. आयएएसमध्ये उपसचिव किंवा संचालक स्तरावरील आयएएस अधिकाऱ्यांची संख्या २०१४ मध्ये ६२१ वरून २०२१ मध्ये ११३० पर्यंत वाढली असली तरी, केंद्रीय प्रतिनियुक्तीवरील अशा अधिकाऱ्यांची संख्या ११७ वरून ११४ वर आली आहे. केंद्राची गरज भागवण्यासाठी ही संख्या पुरेशी नाही.

डीओपीटीने २० डिसेंबर २०२१ रोजी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते, पण उत्तर न मिळाल्याने २८ डिसेंबर २०२१, ६ जानेवारी आणि १२ जानेवारी २०२२ रोजी या संदर्भात स्मरणपत्रे पाठवली. १२ जानेवारी रोजी राज्यांना पाठवलेल्या पत्रात प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवण्याबाबत राज्यांची नाराजी संपुष्टात आणण्याच्या केंद्राच्या अधिकाराचा उल्लेख आहे. राज्य सरकारांना २५ जानेवारी २०२२ पर्यंत नियमातील प्रस्तावित बदलांवर त्यांच्या टिप्पण्या सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ममता यांच्यासह अनेक राज्यांचा विरोध

या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली होती. बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली होती. यामुळे राज्यांच्या प्रशासनावर परिणाम होईल, असा दावा त्यांनी केला होता. ममता यांनी सांगितले की ते सहकारी संघराज्याच्या भावनेच्या विरोधात आहे. यामुळे आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगच्या बाबतीत केंद्र आणि राज्यांमधील सौहार्दपूर्ण व्यवस्था विस्कळीत होईल.

हे सहकारी संघराज्याच्या भावनेच्या विरोधात आहे – हेमंत सोरेन

झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे उत्तराधिकारी हेमंत सोरेन यांनी प्रस्तावित दुरुस्त्या कठोर आणि सहकारी संघराज्याच्या भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे आधीच ताणलेले केंद्र-राज्य संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या दडपशाहीसाठी आणि राज्य सरकारच्या विरोधात सूडाच्या राजकारणासाठी याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, असे सोरेन म्हणाले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही आयएएस कॅडरच्या नियमांमध्ये या प्रस्तावित दुरुस्तीला विरोध केला आहे. हा देशाच्या संघराज्यीय राजकारणाच्या मुळावर आणि राज्याच्या स्वायत्ततेवरचा हल्ला आहे, असे त्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे. जर हे लागू केले तर ते केंद्र आणि राज्यांमध्ये विद्यमान सहकारी संघराज्यवाद आणि केंद्र सरकारमधील अधिकारांचे केंद्रीकरण याच्या भावनेला कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असे स्टॅलिन यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained states opposing center govt decision ias cadre rules amendments abn
First published on: 24-01-2022 at 18:32 IST