मानवी शरीर हे एखाद्या रहस्याप्रमाणेच आहे. आपल्या शरीरात लाखो पेशी, हजारो लीटर रक्त, तेवढीच हाडं अशा एक ना हजारो गोष्टी असतात. ज्यामुळे आपण व्यवस्थितरित्या चालू फिरु शकतो. आपण दिवसभरात अनेक कृती करत असतो. त्यातीलच एक कृती म्हणजे श्वासोच्छवास. श्वासोच्छ्वास ही आयुष्याची यंत्रणा आहे आणि आयुष्याचा श्वासाशी खोल संबंध आहे. म्हणून तर भारतात आपण त्याला प्राण म्हणतो.

श्वासशिवाय माणसाचे जगणं अशक्य असते. पण एखादी व्यक्ती दिवसभर म्हणजे २४ तासात किती वेळा श्वास घेते? हे तुम्हाला माहितीये का? नाही ना…चला तर जाणून घेऊया.

योग्य प्रकारे श्वास घेणं फार महत्त्वाचं

प्राणवायू हा मानवी शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. मेंदूला रक्तपुरवठा करण्यात प्राणवायू अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. श्वास घेणे ही एक अशी क्रिया आहे जी आपण २४ तास करतो. योग्य प्रकारे श्वास घेणं फार महत्त्वाचं असतं. श्वास घेण्याची तुमची पद्धत योग्य असेल तर तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तुम्ही आनंदी राहता. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते

एखादी निरोगी व्यक्ती दर मिनिटाला १५ ते १६ वेळा श्वास घेते. म्हणजेच आपण तासाभरात साधारण ९६० वेळा श्वास घेतो. तर दिवसभरात एखादी निरोगी व्यक्ती २३ हजार ०४० वेळा श्वास घेतो. तसेच एका वर्षात माणूस ८४,०९,६०० वेळा श्वास घेतो.

श्वसनाचे व्यायाम फायदेशीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्ही श्वसनाचे व्यायाम करत असाल त्यावेळी मात्र या संख्येत वाढ होऊ शकते. यानुसार एखादा सर्वसामान्य निरोगी मनुष्य हा २ हजार पेक्षा जास्त गॅलन श्वास घेतो. दीर्घ श्वास घेतल्याने शरीर आणि मन या दोन्हीला फार फायदा होतो. तसेच दीर्घ श्वासाचा व्यायाम केल्यास हृदयही चांगल्या प्रकारे काम करु लागते.