How To Stop Autopay : गूगल पेमुळे अनेक गोष्टी अधिकच सोप्या झाल्या आहेत. पाकीट घरी विसरण्याचे टेन्शन, सुट्ट्या पैशांचे टेन्शन, वीज बिल भरण्यासाठी लांबच्या लांब रांग लावण्याचे टेन्शन अगदी दूर झाले आहे. तसेच नेटफ्लिक्स किंवा इतर ॲपचे सबस्क्रिप्शन, इएमआय आणि इतर अनेक गोष्टींचे पेमेंट करण्याचा एक अत्यंत सोयीस्कर मार्ग म्हणजे गूगल पे वरील ‘ऑटो पे’ (autopay) हे फीचर आहे. मात्र, काही वेळा असं होतं की आपल्याला सबस्क्रिप्शन थांबवायचं असतं आणि ऑटो पे थांबवलं नाही, तर पेमेंट नेहमीप्रमाणे होतच राहतं. तर अशावेळी तुम्ही ऑटो पे रद्दसुद्धा करू शकता. सबस्क्रिप्शन रद्द करून तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळवू शकता. तर गूगल पे वरील ऑटो पे कसं थांबवायचं याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया (How To Cancel Autopay..

गूगल पे वरील ऑटो पे बंद करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा… (How To Cancel Autopay)

१. गूगल पे ॲप उघडा. एकदा उघडल्यानंतर, वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल चिन्हावर टॅप करा. तुम्हाला ‘ऑटोपे’ पर्याय दिसत नाही तोपर्यंत खाली स्क्रोल करा. एकदा हा पर्याय दिसला की त्यावर टॅप करा.

२. ‘लाइव्ह’ टॅबच्या अगदी खाली तुम्हाला ॲक्टिव्ह असलेल्या ऑटो पे सबस्क्रिप्शनची यादी दिसेल. तुम्हाला जे सबस्क्रिप्शन बंद करायचं आहे त्यावर टॅप करा.

३.Cancel autopay या पर्यायावर टॅप करा.

४. त्यानंतर तुम्हाला तुमचा यूपीआय पिन पासवर्ड टाकावा लागेल.

५. ऑटो पे सिलेक्ट झाल्यानंतर कॅन्सलेशन मेसेज येईल आणि त्या सबस्क्रिप्शनचे ऑटो पे बंद होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑटोपे पुन्हा कसे चालू करायचे?

तुम्हाला ऑटोपे सबस्क्रिप्शन पुन्हा सुरु करायचे असल्यास. तुम्हाला उत्पादन किंवा सर्व्हिस पेजवर पुन्हा भेट द्यावी लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही Netflix साठी ऑटोपे सेट केले असल्यास आणि नंतर ते रद्द केले असल्यास, तुम्हाला Netflix वर पेमेंट पद्धत म्हणून तुमचा UPI आयडी पुन्हा एंटर करावा लागेल आणि विनंती जनरेट केल्यानंतर Google Pay मध्ये ते मंजूर करून ऑटोपे रिक्वेस्ट पुन्हा सेट करावी लागेल.