कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी तर कधी कोणाचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे म्हणून तर काहीजण फिरायला जाण्यासाठी पासपोर्ट काढतात. हा पासपोर्ट काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हे माहित असेल तर बराचसा त्रास वाचतो. ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीनं पासपोर्ट काढता येतो. आज आपण ऑनलाइन पद्धतीनं पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यापूर्वी महत्वाचं – ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी तुमचा वापरात असलेला मेल-आयडी आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. यानंतर ऑनलाईन डेटा एंट्री आणि ऑफलाईन डेटा एंट्री असे दोन पर्याय उपलब्ध असतात. इंटरनेट असताना फॉर्म भरता येतो. तर ऑफलाईनमध्ये पीडीएफ फाईल सेव्ह करुन नंतर आपल्या सोयीनुसार फॉर्म भरण्याची सुविधा आहे.

ऑनलाइन पद्धतीनं अर्ज कसा भराल –
http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/procEFormSub या संकेतस्थळावर जा. तेथे प्रथम दिलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करा.

तुमचा लॉग-इन आयडी तयार होईल.

नवीन पासपोर्ट काढण्यासाठीच्या लिंकवर (अप्लाय फॉर न्यू पासपोर्ट) क्लिक करा.

जर तुम्ही पूर्वी पासपोर्ट काढला असेल तर (री-इश्यू ऑफ पासपोर्ट) या लिंकवर क्लिक करा.

दिलेल्या अर्जामध्ये आवश्यकता असेली माहिती भरा आणि अर्ज ‘सबमिट’ करा.

त्यानंतर पे अ‍ॅण्ड शेडय़ूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. त्यावर व्हिव्ह सेव्ह्ड/ सबमिटेड अ‍ॅप्लिकेशनवर क्लिक करा.

पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा अनिवार्य केली आहे.

तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डने ऑनलाइन पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगद्वारेही तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता.

प्रिंट अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन रेफरन्स क्रमांक असलेली पावती छापून येईल.

पासपोर्ट कार्यालयाला तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि वरील नमूद केलेल्या पावतीसह ठरलेल्या दिवशी आणि वेळी भेटू शकता.

ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन जनरेट केल्यावर ९० दिवसांच्या आत तुम्हाला पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागेल.

पुढील माहिती तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to gate information online passport application nck
First published on: 17-02-2020 at 09:17 IST