How to Quietly Limit Someone on Instagram : इन्स्टाग्रामवर स्क्रोल करताना अनेकदा नको असलेल्या युजर्सच्या पोस्ट्स किंवा स्टोरीज सतत समोर येतात. या लोकांना ब्लॉक किंवा रिपोर्ट करावंसं वाटत नाही, पण त्यांच्या पोस्ट्सही सतत पाहावाश्या वाटत नाहीत, अशी स्थिती तुमचीही होते का? अशावेळी तुम्ही अशा नको असलेल्या लोकांना रेस्ट्रिक्ट करू शकता.
इन्स्टाग्रामवरील रेस्ट्रिक्ट टूलमुळे तुम्ही काही युजर्सना तुमच्या संपर्कात येण्यापासून थांबवू शकता. असं केल्यामुळे तुमचं ऑनलाईन स्टेटस, मेसेजना मर्यादित करू शकता. त्यांनी तुमच्या पोस्ट्सवर केलेल्या कमेंट्सही तुम्ही इतरांपासून लपवू शकता. तसंच, त्यांनी काही मेसेज केले तरी ते तुमच्या मुख्य इनबॉक्समध्ये येण्यापेक्षा रिक्वेस्टेड मेसेज बॉक्समध्य जातील. त्यामुळे तुम्ही अशा नको असलेल्या लोकांना कसं रेस्ट्रिक्ट कराल, हे पाहूयात.
युजर्सला रेस्ट्रिक्ट कसं कराल? (How to Restrict Users on Instagram)
- सुरुवातीला तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करा.
- तुम्हाला ज्या युजरला रेस्ट्रिक्ट करायचं आहे, त्याचं नाव सर्च करून त्याच्या प्रोफाईलला जा.
- त्याच्या प्रोफाईलच्या वर उजव्या बाजूला तीन डॉट असतील, त्यावर क्लिक करा.
- त्या तीन डॉटवर Restrict असा पर्याय असेल, त्यावर क्लिक करून Confirm करा.
हा एक सोपा पर्याय आहे. त्याव्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या मार्गानेही ठराविक लोकांना रेस्ट्रिक्ट करू शकता.
तुमच्या प्रोफाईलवर जा. तेथील सेटिंग्स आणि अॅक्टिव्हिटीमध्ये जाऊन रेस्ट्रिक्टेडवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ज्या व्यक्तिला रेस्ट्रिक्ट करायचं आहे त्याची प्रोफाईल सर्च करून तिथे क्लिक करा.
म्युटही करू शकता (Mute Users on Instagram)
तुम्हाला रेस्ट्रिक्ट करायचं नसेल तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्युटही करू शकता. समोरच्या व्यक्तीला अनफॉलो न करताही त्याच्या फोटो आणि पोस्ट्सपासून तुम्ही लांब राहू शकता.