How To Get Free OTT Subscription From Flipkart: भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्स मनोरंजनाच्या बाबतीत वर्चस्व गाजवताना दिसत आहे. आपल्यालाही याची इतकी सवय झाली आहे की एखादी नवीन वेब सीरिज किंवा चित्रपट रिलीज झाला की, आपल्याला लगेच तो पाहायचा असतो. पण, काही ओरिजिनल कंटेंट फक्त सबस्क्रायबर्ससाठीच उपलब्ध असतो. पण, बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने त्या सर्वांना एका वेळी सबस्क्राइब करणे खर्चीक असते. कारण- ओटीटी सबस्क्रिप्शन सहसा प्राईज टॅगसह (वेगवेगळ्या किमतीसह) येतात. पण, पूर्ण किंमत न देता झी ५(Zee5), सोनी लाइव्ह (Sony LIV) आणि त्यापेक्षा अधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) त्याच्या सुपरकॉइन रिवॉर्ड सिस्टीमचा वापर करून विनामूल्य किंवा सवलतीच्या सब्सक्रिप्शन मिळवण्यासाठी एक सोपी पद्धत ऑफर करते आहे; तर या ऑफरचा लाभ कसा घ्यावा याबद्दल जाणून घेऊ…

फ्लिपकार्टचे (Flipkart) मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…

१. सुपरकॉईन्स ॲक्सेस करा

Jugad for home safety tips to protect house from thieves and fraud video goes viral
VIDEO: घरात चोरी होऊ नये म्हणून तरुणानं शोधला भन्नाट जुगाड; एकही रुपया खर्च न करता आधी हे काम करा, घरात कधीच चोरी होणार नाही
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
punekar man wrote message in back of the tempo for youth video goes viral
आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! नोकरीसाठी पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकानं या गाडीमागची पाटी एकदा वाचाच; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Gold and silver prices rise by Rs 3,100 per 10 grams and Rs 4,000 per kilogram in the past week.
Gold Rate : आठवड्याभरात सोन्याचे भाव हजारो रुपयांनी वाढले, चांदीही चकाकली
cryptocurrency tax
Cryptocurrency Trading : क्रिप्टो ट्रेडिंग आणि नफ्यावर किती कर द्यावा लागणार? अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं?
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
Sebi cracking down on finfluencers
इन्फ्लुएंसर्स सेबीच्या रडारवर? इन्स्टा-युट्यूबवर झटपट श्रीमंतीच्या टिप्स देणं महागात पडण्याची चिन्हं
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच

फ्लिपकार्ट (Flipkart) ॲप किंवा वेबसाइट ओपन करा. होम पेजवर SuperCoin पर्याय टॅप करा. जिथे तुम्ही कमावलेल्या एकूण नाण्यांची (कॉइन्स) संख्या पाहू शकता.

२. ओटीटी सबस्क्रिप्शन निवडा

मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन मिळवा “Get Free OTT Subscriptions ” हा मजूकर शोधा. त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म लाइव्ह, झी ५, टाइम्स प्राईम प्रीमियम पॅक, गाना व ओटीटी प्लेच्या उपलब्ध ओटीटी प्लॅटफॉर्मची किंमत दिसेल. काही सबस्क्रिप्शनसाठी फक्त SuperCoins आवश्यक असतात.

३. तुमचा कूपन कोड मिळवा

तुम्हाला जे ओटीटी सबस्क्रिप्शन पाहिजे आहे ते निवडा. तुम्ही ‘Use Coin’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फ्लिपकार्ट खात्याच्या ‘My Rewards’ सेक्शनमध्ये एक कूपन कोड तयार होईल आणि सेव्ह होईल.

४. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कूपन रिडीम करा

तुम्ही निवडलेल्या तुमच्या ओटीटी सर्व्हिसच्या वेबसाइटवर जा. तुमच्या मोबाइल नंबरसह साइन इन करा, मेगा मेनूवर नेव्हिगेट करा आणि ‘Activate Offer’ करा हे तेथे निवडा. तुमच्या सबस्क्रिप्शनसाठी कूपन कोड लागू करा.

५. आवश्यक असल्यास पूर्ण पेमेंट करा

काही प्लॅटफॉर्मसाठी सुपरकॉइन्स एक मोठा भाग व्यापतात, तरीही तुम्हाला सबस्क्रिप्शन शुल्काचा काही भाग भरावा लागेल. तुमचे कूपन लागू केल्यानंतर कमी केलेली रक्कम भरा आणि तुमचे सदस्यत्व ॲक्टिव्ह होईल. मनोरंजनाच्या पलीकडे, फ्लिपकार्ट सुपर कॉइन्ससह इतर अनेक फायदेसुद्धा देतात. जसे की संपूर्ण प्लॅटफॉर्मवर विविध उत्पादने आणि सेवांवर सूट. तुमच्या सुपरकॉइन्सचा वापर करून तुम्ही पैशांची बचत करून अनेक ऑफर्सचा आनंद घेऊ शकता.

Story img Loader