AC Tips: दमट व उष्ण वातावरण असल्यानं अनेकांच्या घरात सातत्यानं एसी सुरु असतो. त्यामुळं प्रचंड लाईटबील येते. लोक पर्याय म्हणूम एसीचा वापर करतात एसी म्हणजेच एअर कंडिशनर घर किंवा एखादा भाग शांत ठेवण्यात मदत करतं. पण हे असं उपकरण आहे की ज्यामुळे वीजेचं बिल खूपच जास्त येतं, म्हणून अनेक लोक याला वापरताना १० वेळा विचार करतात. विजेचा जास्त वापर होऊ नये म्हणून अनेकजण अगदी अर्धा एक तास एसी चालू करुन रुम थंड झाल्यानंतर तो बंद करतात. मात्र थोडाच वेळ एसी वापरुनही फार बील येत असल्याची तक्रार अनेकजण करतात. असं का होतं? चला जाणून घेऊयात.

थोडावेळ एसी वापरूनही वीजबिल जास्त येतंय का?

वीजबिल टाळण्यासाठी, काही लोक १-२ तास एसी चालू ठेवून खोली थंड केल्यानंतर बंद करतात. मात्र ही एसी स्विच ऑफ करण्याचे २ मार्ग आहेत, एक रिमोटवरून आणि दुसरा मुख्य स्विचवरून. अनेकदा होतं असं की लोक एसी रिमोटने बंद करतात. मात्र केवळ रिमोटने एसी बंद केल्याने वीजेचं बील येत नाही असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कमी वेळ एसी चालवूनही त्यांचे वीज बिल खूप जास्त येत असल्याची तक्रार अनेकांची आहे. चला तर मग जाणून घेऊया एसीचा कमी वापर करूनही वीज बिल जास्त का येते. यासाठी काय काळजी घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून वीज बिल कमी येईल.

What is nomophobia?
तुम्हाला स्मार्टफोनपासून दूर राहण्याची भीती वाटतेय का? हे आहे नोमोफोबियाचे लक्षण; जाणून घ्या सविस्तर
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

फक्त रिमोटने एसी बंद करता?

होतं असं की अनेकजण एसीचा वापर प्रामुख्याने बेडरुममध्ये करतात. रात्री झोपेत असताना एसी सुरु नसावा असं वाटलं तर केवळ रिमोटने तो बंद करतात. एसीचा मुख्य स्वीच झोपण्याच्या जागेपासून दूर असल्याने तो बंद करण्याच्या भानगडीत लोक पडत नाहीत. मात्र याच आळसामुळे तुमचं विजेचं बिल वाढतं. कारण रिमोटने एसी बंद केल्यावर इनडोअर युनिट थांबते परंतु बाहेरचे युनिट चालूच राहते.

बील मर्यादित ठेवायचं असेल तर…

जेव्हा तुम्ही रिमोटवर बटन बंद करता तेव्हा एसीची लाईट बंद होते, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की एसी बंद झाली आहे. मात्र रिमोटने एसी बंद करुनही एसीमध्ये वीज येत असते. आऊटडोअर युनिट बाहेर असल्यामुळे, तुमचा एसी बंद नसून चालू असतो आणि सतत वीज वापरत असतो हे तुम्हाला कळत नाही. या स्थितीत तुम्ही एसी कमी वापरला, तरीही तो चोवीस तास चालल्याप्रमाणेच वीज बिल येईल.

हेही वाचा – आर्मी कॅन्टीनमध्ये किती स्वस्तात मिळते सामान? कोण घेऊ शकतं याचा फायदा? जाणून घ्या सविस्तर

मेन स्विच नेहमी बंद करा

त्यामुळे आतापासून एसी बंद केल्यानंतर मेन लाईनवरूनही एसी बंद करण्याची सवय लावा. मेन लाईनवरून एसी बंद होताच त्यात विद्युतप्रवाह थांबेल आणि तुम्हाला वीजबिल जास्त येणार नाही.