Indian Railway: देशात लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. वाहतुकीचे स्वस्त साधन असल्याने त्यातही प्रवाशांची गर्दी असते. अनेक वेळा ट्रेनचा जनरल डब्बा इतका भरलेला असतो की त्यात पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की या परिस्थितीत, द्वितीय श्रेणीच्या सामान्य तिकिटाच्या आधारावर, रेल्वेच्या इतर कोणत्याही बोगीमध्ये म्हणजे आरक्षित वर्गाच्या बोगीतून प्रवास करता येईल का? याबाबत रेल्वेचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

सामान्य तिकिटावरील प्रवासाचे नियम

वरील परिस्थितीत तुम्ही तसे करू शकता, परंतु काही अटी देखील आहेत ज्या तुम्हाला माहित असणे गरजेच्या आहेत. द्वितीय श्रेणीच्या रेल्वे तिकिटाची वैधता रेल्वे कायदा, १९८९ अंतर्गत आहे. नियमांनुसार, जर तुमचा प्रवास १९९ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तिकीटाची वैधता ३ तास आहे आणि जर यापेक्षा जास्त अंतर असेल तर ते २४ तास आहे. जर तुमच्याकडे सेकंड क्लासचे तिकीट असेल आणि जनरल डब्यात पाय ठेवायलाही जागा नसेल, तर रेल्वे कायद्यानुसार तुम्हाला पुढची ट्रेन येईपर्यंत थांबावे लागते. कारण हे तिकीट प्रवासासाठी आहे, कोणत्याही विशिष्ट ट्रेनसाठी आरक्षित नाही.

सामान्य तिकिटावर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्याचा अधिकार

तिकिटाच्या वैधतेच्या मर्यादेत इतर कोणत्याही ट्रेनचा पर्याय नसल्यास, तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकता, परंतु येथे तुम्हाला कोणत्याही रिकाम्या सीटवर बसण्याचा अधिकार नाही. रेल्वे कायद्याच्या कलम १३८ अन्वये, तुम्ही ट्रेनमध्ये प्रवेश करताच सर्वात आधी तुम्हाला TTE ला शोधायचे आहे आणि त्यांना भेटताच, तुम्ही कोणत्या परिस्थितीत स्लीपर क्लासमध्ये प्रवेश केला आहे हे सांगावे लागेल. कोणतीही जागा रिक्त असल्यास TTE तुमच्याकडून दोन्ही वर्गांच्या प्रवासाच्या तिकिटांचा फरक घेऊन स्लीपर क्लासचे तिकीट तयार करेल. कोणतीही सीट रिकामी नसल्यास पुढील स्थानकापर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

( हे ही वाचा: ‘या’ देशात फक्त ४० मिनिटांची रात्र असते; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतरही तुम्ही स्लीपर क्लासमधून बाहेर न पडल्यास २५० रुपये दंड भरून प्रवास सुरू ठेवू शकता. तुमच्याकडे २५० रुपये नसल्यास TTE तुमचे चालान तयार करेल जे तुम्ही नंतर न्यायालयात सादर करू शकता. विशेष म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जनरल डब्यात जाण्यास वाव मिळत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही.