पोपट हा जगातील एकमेव असा पक्षी आहे; जो मानवी आवाजांचे हुबेहूब अनुकरण करू शकतो. एखाद्या व्यक्तीने तोंडून उच्चारलेले शब्द ऐकून तो ते पुन्हा म्हणू शकतो. जगातील कोणताही प्राणी किंवा पक्षी असे करू शकत नाही. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, पोपट हे मानवी आवाज हुबेहूब कसा काढू शकतो? त्याच्या गळ्यात अशी कोणती विशेष गोष्ट असते? तुम्हालाही हवी आहेत ना याची उत्तरे; मग ती आपण जाणून घेऊ.

पोपट माणसांचे हुबेहूब आवाज काढतो, ही गोष्ट प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणारी आहे. हा पक्षी अनेक शतकांपासून मानवाच्या अगदी जवळ आहे. माणसाने त्याला वाढवले. जेव्हा पोपट एखाद्या माणसाच्या आवाजाची नक्कल करतो, तेव्हा स्वाभाविकत: त्या व्यक्तीलाही खूप आनंद होतो.

Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
design purpose, intended use, ease of use, safety, train collisions, cow-buffalo collisions, car design, aerodynamic shape, environment friendly trees, ornamental trees, LED lights, building construction, glass and aluminum, sustaiable constructions, green buildings, environmental damage, climate, bamboo alternatives, cement production, urban heat, water scarcity, natural balance, political will, foresight,
काय गरज आहे काचेच्या इमारतींची, सन-डेक आणि झगमगाटाची?
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
Here are six tips to make your old car look new
तुमची जुनी कार नवी दिसण्यासाठी ‘या’ सहा टिप्स करतील मदत; कार दिसेल नेहमी चकाचक
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Kalidas artful clown marathi news
कालिदासाचे कलामर्मज्ञ विदूषक
how to take steam correctly
चेहऱ्यावर वाफ घेताना आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; नाहीतर डोळ्यांना होऊ शकते इजा! लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….

पोपट माणसासारखा बोलतो याबद्दल विज्ञान असे सांगते की, पोपटांच्या श्वासनलिकेमध्ये सिरिंक्स नावाचा अवयव असतो; ज्याद्वारे ते माणसासारखे आवाज काढू शकतात किंवा माणसाच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करू शकतात.

पोपटाच्या कंठातून हवा जाते तेव्हा सिरिंक्स कंपन पावते; ज्यामुळे आवाज येतो. स्नायू आणि मऊ हाडांच्या रिंगांद्वारे ‘सिरिंक्स’ला नियंत्रित केले जाते; ज्यामुळे पोपटांना आवाजाचे अनुकरण करता येते. त्यामुळे त्यांना गाणी गाणे किंवा मानवांप्रमाणे बोलणे शक्य होते. ते श्वासनलिकेची खोली आणि आकार बदलून वेगवेगळे आवाज काढतात. पोपटाच्या प्रजातीतील इतर काही पक्षीदेखील असे करू शकतात.

पोपटांची जीभ जाड असते; जी त्यांना आवाजाचे अनुकरण करण्यास मदत करते. पोपट विशेषतः मानवी शब्द आणि आवाजांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. उदाहरणार्थ- पोपट “हॅलो, कसे आहात?” असे सहज म्हणू शकतो. असे असले तरी पोपटांना माणसाप्रमाणे समज नसते किंवा माणूस काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते; परंतु तुम्ही ज्या गोष्टी रोज वारंवार बोलता, त्या ऐकलेल्या गोष्टी पुन्हा त्याच पद्धतीने उच्चारण्यात पोपट खूप पटाईत असतात.

तज्ञांच्या मते, पोपटांना बहुतेक शब्दांचा अर्थ समजत नाही; पण त्यांना शब्दांच्या सभोवतालच्या संदर्भाची जाणीव असते. ते शब्दांशी संबंध जोडू शकतात. उदाहरणार्थ- एका संशोधकाने नोंदवलेल्या मतानुसार एक पोपट विचारू शकतो, “तुम्ही कसे आहात?” जेव्हा तो असे म्हणतो तेव्हा तो त्याच्या मेंदूचा वापर करीत नाही, तर त्याने तुम्ही बोलत असताना हे शब्द रोज ऐकलेले असतात.

तुम्ही असेही म्हणू शकता की, पोपट अप्रतिम मिमिक्री करतात. ते अनेक गोष्टींचे अनुकरण करतात. उच्चारलेले शब्द, तसेच कुत्र्याच्या भुंकण्यापासून ते दरवाजाच्या आवाजापर्यंत अनेक गोष्टींचे हुबेहूब आवाज काढून दाखवण्याची क्षमता पोपटांमध्ये असते.

बहुतेक पोपट त्यांच्या मालकाच्या बोलण्याचे अनुकरण करतात तेव्हा ते काय बोलत आहेत हे प्रत्यक्षात त्यांना कळत नाही. कधी कधी याला अपवाद असतात. विज्ञान सांगते की, पोपटांचा मेंदू मोठा असतो. तो एक बुद्धिमान पक्षी आहे. त्यांच्याकडे जटिल स्वरक्षमता, तसेच संज्ञानात्मक कौशल्ये आहेत. दुसरी सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे ते एका सामाजिक रचनेत राहतात. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधण्याची आणि समाजात मिसळण्याची गरज वाटते.

पोपटाचा मेंदू इतर पक्ष्यांपेक्षा मोठा असतो. मानवी मेंदूचे सरासरी वजन सुमारे तीन पौंड असते आणि आकार अंदाजे ५.५ x ६.५ x ३.६ इंच इतका असतो. पोपटाच्या मेंदूचे वस्तुमान १.१५ ते २०.७३ ग्रॅम असते. पोपटांच्या मेंदूत २२७ दशलक्ष – 3.14 अब्ज न्यूरॉन्स असतात.

पोपटाची रचना मानवी मेंदूसारखी असते; ज्याला पॅलियम म्हणतात. पोपटाच्या मेंदूचे कॉर्टिकलसदृश भाग मानवी कॉर्टेक्ससारख्याच पॅलियल भागांमधून घेतले जातात.

कॅनेडियन अभ्यासकाने पोपटांमधील न्यूरल सर्किट ओळखले; जे प्राइमेट्स आणि मानवांमध्ये आढळलेल्या न्यूरल सर्किटसारखे आहे. हे सर्किट पोपटांच्या बुद्धिमत्तेसाठी जबाबदार आहे. पोपटांमध्ये इतर पक्ष्यांपेक्षा जास्त संवादकौशल्य असते. त्यांच्याकडे तुलनेने मोठा टेलेन्सेफॅलिक-मध्यमस्तिष्कही असतो; जो प्राइमेट्सला टक्कर देतो.