What is Juice Jacking : आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते हिमंता बिस्वा सरमा हे सध्या चर्चेत आहेत. यासाठी त्यांनी केलेली एक पोस्ट ठरली आहे. सरमा यांनी नुकतेच केलेल्या विमान प्रवासादरम्यान एका सह प्रवाशाच्या इंटरनॅशनल चार्जरची केबल घेतली होती आणि ती चुकून त्यांच्याकडेच राहिली. यानंतर या संबंधित व्यक्तीशी संपर्क करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पण अशी दुसर्‍याकडून केबल घेणं याबद्दल सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. लोक त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये हॅकिंगबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्ते हॅकिंगच्या धोक्याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी त्यांना फोन तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे. डेटा हॅकिंग, यूएसबी हॅकिंग, ज्यूस जॅकिंग गंभीर गुन्ह्यांबद्दल देखील लोक सावधान रहाण्याचा सल्ला देत आहेत.

हे ज्यूस जॅकिंग नेमकं काय असतं?

तर हा एक सायबर गुन्हेगारीचे प्रगत तंत्रज्ञान आहे. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास चार्जरच्या माध्यमातून केली जाणारी हॅकिंग असून याचे तांत्रिक नाव ज्यूस हॅकिंग आहे. याच्या माध्यमातून तुमच्या फोनमधील महत्त्वाचा डेटा चोरी केला जातो.

तुम्ही आयफोन किंवा अँड्रॉइड फोन वापरत असाल आणि तुमच्या फोनची चार्जिंग संपल्यानंतर तुम्हीही मागचा पुढचा विचार न करता तो कुठेही चार्जिंगला लावत असाल तर तुमच्यासाठी हे कधीतरी खूप अडचणीचे ठरू शकते. अशाने तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो. विशेषतः एखाद्या सार्वजनिक ठिकाणी हे होण्याचा धोका जास्त असतो.

रेल्वे स्टेशन, मॉल, विमानतळ, मेट्रो किंवा बस स्टँड, हॉटेल, ऑफिस अशा ठिकाणी हे घडू शकतं. एकाच जागी अनेक लोक त्यांचा फोन चार्ज करत असतील आणि तेथे यूएसबी पोर्ट आधीच लावलेले असतील तर तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंगला लावणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

ज्यूस-जॅकिंग हा शब्द पहिल्यांदा २०११ मध्ये समोर आला होता. बॅटरीमध्ये किती पॉवर शिल्लक आहे असं विचारताना साधारणपणे बॅटरीत किती ज्यूस आहे? असा शब्द प्रयोग वापरला जातो. त्यामुळे याला ज्यूस-जॅकिंग असं म्हटलं जातं.

गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारे घडलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. २०२२ मध्ये हैदराबाद येथील एका कंपनीच्या सीईओबरोबर अशीच फसवणूक झाली होती. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांचा मोबाईल यूएसबी पोर्टच्या माध्यमातून चार्जिंगला लावला आणि त्यांच्या खात्यातील १६ लाख रुपये चोरीला गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंमता सरमा यांच्याबरोबर देखील असेच काही होईल असे नाही, कारण त्यांना चार्जर आणि केबल देण्यात आली होती, तसेच त्यांनी विमानातील चार्जिंग पोर्टचा वापर केला असेल, अशा ठिकाणी प्रोग्राम रण करणे अवघड आहे.