Petrol Diesel Buying Tips: गाडीशिवाय घराबाहेर पडणेच कठीण आहे. पेट्रोल चैनीसाठी नाही तर ही दैनंदिन गरज झाली आहे. अनेकांना पेट्रोल भरताना टाकी फुल्ल करण्याची सवय आहे. मात्र, उन्हाळ्यात पेट्रोल भरताना टाकी पूर्ण भरू नका. टाकी पूर्ण भरल्यास त्यात हवा खेळती राहात नाही. यामुळे पेट्रोलची वाफ होत असून पेट्रोल उडण्याचा धोका आहे. 

पेट्रोल आणि डिझेलशी संबंधित अनेक तथ्ये शेअर केली आहेत. गाडीचे मायलेज वाढवण्याच्या युक्तीपासून ते पेट्रोलच्या किमतीपर्यंत अनेक गोष्टी कुठे ना कुठे जातात. त्याचप्रमाणे पेट्रोल भरण्याची योग्य वेळ असते आणि त्या वेळी इंधन भरणे चांगले असते, असे अनेकांचे म्हणणे आहे. सकाळी पेट्रोल टाकणे योग्य आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे तर रात्री पेट्रोल टाकणे योग्य आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठराविक वेळी पेट्रोल टाकून काही परिणाम होतो का, की चुकीच्या पद्धतीने अशी तथ्ये शेअर केली जात आहेत. तर जाणून घ्या काय आहे सत्य….

Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

अनेक प्रकारचे तथ्य सोशल मीडियावर व्हायरल

याबद्दल अनेक प्रकारचे तथ्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि इंटरनेटवर याशी संबंधित अनेक लेख आहेत, ज्यामध्ये रात्री किंवा पहाटे गाडीत पेट्रोल टाकावे असे सांगितले आहे. याशिवाय हे सत्य नेहमी शेअर केले जाते की, सकाळी लवकर पेट्रोल टाकल्याने पैशांची बचत होते आणि अधिक पेट्रोल कारमध्ये टाकता येते. तर जाणून घ्या काय आहे त्याचे सत्य…

(हे ही वाचा: Car Tips : पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीमध्ये डिझेल भरल्यास काय होईल? यानंतर गाडी चालते का? जाणून घ्या)

गाडीत पेट्रोल दिवसा टाकावे की रात्री?

हे खरे आहे की, उष्णतेमुळे इंधनाचा विस्तार होतो, ज्यामुळे इंधन कमी दाट होते. अशा परिस्थितीत असे म्हणतात की, जर तुम्ही सकाळी पेट्रोल भरले तर पेट्रोल दाट राहील, त्यामुळे जास्त पेट्रोल येईल आणि कमी पैशात जास्त पेट्रोल भरून मिळेल. मात्र, जगभरातील बहुतांश इंधन केंद्रे किंवा पंप जमिनीच्या खाली टाक्या बनवतात आणि तेथे पेट्रोल-डिझेलचा साठा ठेवतात, असा उलट तर्क आहे. यामुळे इंधन स्थिर तापमानात राहते आणि या टाक्या खूप जाड थर असलेल्या भिंतींनी बनवल्या जातात.

तुम्ही केव्हाही पेट्रोल भरले तर काय होते, त्याचा तापमानावर परिणाम होत नाही. यासोबतच पेट्रोलच्या घनतेवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही दिवसभरात पेट्रोल घातले तरी तुमचे काही नुकसान नाही आणि सकाळी लवकर पेट्रोल घेतल्याने फारसा फरक पडत नाही.