Animals That Mate For Life: आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच व्यक्तीने आपल्यावरही नि:स्वार्थी प्रेम करून आपली आयुष्यभर साथ द्यावी, अशी अनेक व्यक्तींची इच्छा असते. अनेक जण हे स्वप्न सत्यात उतरवतात; परंतु काही जण मात्र प्रेम टिकवण्यात असमर्थ ठरतात. परंतु, प्राण्यांच्या जगात जगण्याची प्रवृत्ती अनेकदा भावनिक बंधनांपेक्षा जास्त असते. काही प्रजाती अगदी आयुष्यभर जोडीदाराबरोबरचे बंधन तयार करण्यासाठी ओळखल्या जातात. हे प्राणी आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहण्याचा पर्याय निवडून अल्पकालीन प्रजननाच्या नियमांचे उल्लंघन करतात. प्राण्यांच्या जगात एकपत्नीत्व ही प्रामुख्याने जगण्याची एक महत्त्वाची युक्ती मानली जाते.

आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहणाऱ्या प्राण्यांबद्दल कौतुक आणि त्यांची प्रेम करण्याची कल्पना चांगली वाटत असली तरी शास्त्रज्ञांच्या मते, प्राण्यांच्या जगात एकपत्नीत्व ही प्रामुख्याने जगण्याची एक महत्त्वाची युक्ती मानली जाते. परंतु, ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे की, आजीवन एकाच जोडीदारबरोबर राहणारे प्राणी दुर्मीळ आहेत. ‘बीबीसी अर्थ’च्या एका व्यापक अभ्यासानुसार, सस्तन प्राण्यांच्या केवळ ३-५% प्रजाती एकपत्नीत्व सांभाळणाऱ्या आहेत.

मात्र, आपल्याला वाटते त्याप्रमाणे यामागे प्राणी जोडप्यातील प्रेम किंवा भावनिक बंध हे कारण नाही. तर आनुवंशिक यशाची शक्यता वाढवणे आणि त्यांच्या पिल्लांचे अस्तित्व सुनिश्चित करणे हे कारण त्यामागे आहे.

‘हे’ प्राणी आयुष्यभर एकत्र राहतात

लांडगे

लांडगे कदाचित सर्वांत प्रसिद्ध एकपत्नी प्रजातींपैकी एक आहेत. लांडग्यांच्या समूहात सामान्यतः एक प्रमुख प्रजनन जोडी, अल्फा नर आणि मादी आणि त्यांची संतती असते. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटच्या मते, हे आजीवन बंधन पिल्लांचे अधिक यशस्वीपणे संगोपन करतात. एकाच जोडीदाराबरोबर राहून, लांडगे एक मजबूत, सहकारी सामाजिक एकता राखतात, ज्यामुळे संपूर्ण गटाचे अस्तित्व टिकून राहते.

हंस

हंस हे प्रेमाचे प्रतीक बनले आहेत. कारण- ते आयुष्यभर एकत्र राहतात. हे सुंदर पक्षी मजबूत जोडीदार बंध तयार करतात आणि घरटे बांधण्यात व प्रजनन वाढवण्यात सहकार्य करतात. कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, काही हंस जोड्या वंध्यत्वामुळे किंवा घरटे बांधण्यात अयशस्वी झाल्यामुळे एकमेकांपासून दूर होतात. परंतु, बहुतेक हंस एकनिष्ठ राहतात. त्यांचे जोडीदाराशी असलेले नाते त्यांना आपला परिसर सुरक्षित ठेवण्यात साह्यभूत ठरते.

गिबन

आग्नेय आशियातील मूळचे लहान माकड गिबन हे कुटुंब गटाने राहतात, ज्यात सामान्यतः एकपत्नी नर-मादी आणि त्यांची पिल्ले असतात.
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या मते, या सामाजिक रचनेसाठी प्राइमेट्समध्ये गिबन्स अद्वितीय आहेत. एकपत्नीत्वामुळे गटांमधील संघर्ष कमी होण्यास मदत होते आणि त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करण्यात आणि संततीची काळजी घेण्यात सहकार्य सुनिश्चित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेंग्विन

विविध पेंग्विन प्रजातींपैकी, एम्परर आणि जेंटू पेंग्विन दीर्घकालीन जोडीदार बंध निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. जरी सर्व पेंग्विन जीवनभर पूर्णपणे एकपत्नीत्वाचे पालन करणारे नसले तरी अनेक प्रजाती प्रत्येक प्रजनन हंगामात एकाच जोडीदाराबरोबर पुन्हा एकत्र येतात. अंटार्क्टिकाच्या कठीण परिस्थितीत, पेंग्विन उष्मायन आणि पिल्लांचे संगोपन यांचे ओझे सामायिक करतात. नॅशनल जिओग्राफिकच्या एका अभ्यासात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा सहकार्यामुळे अत्यंत वातावरणात जगण्याची शक्यता वाढते.

बीव्हर

बीव्हर हा उंदीर समूहातील प्राणी आहे. यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसच्या मते, बीव्हर जोडीदाराच्या सोबतीने घर बांधणे, अन्न गोळा करणे आणि पिल्लांचे संगोपन करणे अशी कामांची जबाबदारी वाटून घेतात. त्यांची सहकारी जीवनशैली त्यांच्या पर्यावरणीय यशाची गुरुकिल्ली आहे आणि एकपत्नीत्वामुळे त्यांना जगण्याचा फायदा होतो.