scorecardresearch

हॉटेल, मॉटेल आणि रिसॉर्टमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

हॉटेल, मॉटेल आणि रिसॉर्ट या एकसारख्याच वाटणाऱ्या गोष्टींमध्ये नेमका काय फरक असतो जाणून घ्या

हॉटेल, मॉटेल आणि रिसॉर्टमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
हॉटेल, मॉटेल आणि रिसॉर्टमधील फरक (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा जाण्याआधी आपण तिथे राहण्याची सोय व्हावी यासाठी हॉटेलमध्ये बुकिंग करतो. अनेकवेळा आपल्यापुढे हॉटेल, मॉटेल, रिसॉर्ट असे पर्याय उपलब्ध होतात. पण या पर्यायांमध्ये नेमका कोणता फरक काय? हॉटेल, मॉटेल आणि रिसॉर्ट या एकसारख्याच वाटणाऱ्या गोष्टींमध्ये नेमका फरक काय आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. यांमध्ये काय फरक आहे जाणून घ्या.

हॉटेल

हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीबरोबर रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, स्पा या सेवाही उपलब्ध असतात. या सुविधा पर्यटक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध असते. बहुतांश वेळा हॉटेल्स शहराच्या मुख्य ठिकाणी असतात, ज्यामुळे तिथे मिटींग्स, कॉन्फरन्स देखील आयोजित करण्यात येतात. हॉटेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवेनुसार त्या हॉटेलला स्टार देण्यात येतात. हॉटेलला १ ते ५ स्टार्स देण्यात येतात फ्लॅट हॉटेल्स, बुटीक हॉटेल्स, बजेट हॉटेल्स, कॉन्फरन्स हॉटेल्स, लक्झरी हॉटेल्स, लिमिटेड सर्विस हॉटेल्स असे हॉटेलचे काही प्रकार आहेत.

आणखी वाचा: भारतात फक्त ‘या’ ठिकाणी चारही बाजूने येते रेल्वे; महाराष्ट्रातील जागेचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

मॉटेल
मॉटेल्स बहुतांश वेळा हायवेवर उपलब्ध असतात. मॉटेल्समध्ये ग्राहकांसाठी मोठी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येते. मॉटेल एक किंवा दोन मजलीच असतात. थोड्या वेळासाठी थांबण्यासाठी मॉटेल प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे. इथे कमी सुविधा उपलब्ध असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासाचे नियोजन असणाऱ्या व्यक्तींसाठी मॉटेल उत्तम पर्याय आहे.

रिसॉर्ट
रिसॉर्टमध्ये लक्झरीयस सुविधा पुरवल्या जातात. रिसॉर्ट सहसा आकर्षक ठिकाणी पर्यटकांना आरामदायी अनुभव देण्यासाठी उभारण्यात येतात. रिसॉर्ट इतर पर्यायांच्या तुलनेत खर्चिक ठरू शकते.

आणखी वाचा: फळांवर असणाऱ्या अंकांचा अर्थ काय असतो? आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टीबाबत लगेच जाणून घ्या

अशाप्रकारे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सुविधा, तेथील वास्तुचा आकार यांमध्ये फरक आढळतो. कॉकटेल लाउंज, रूम सर्व्हिसेस, ऑन-साइट रीक्रीएशन, इनडोअर स्विमिंग पूल, मालिश आणि हॉट टब, स्पा अशा सुविधा रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात, हॉटेल्समध्ये काही अंशी प्रमाणात तर मॉटेल्समध्ये या सुविधा उपलब्ध नसतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 14:33 IST

संबंधित बातम्या