chapati meaning in english : पोळी हा आपल्या भारतीय आहारातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. सकाळी आणि रात्रीच्या जेवणात पोळ्यांचा समावेश असतो. पोळी-भाजी हा तर अनेक लोकांचा मुख्य आहार आहे. गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी पोळी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. कारण- पोळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.

दररोजच्या आहाराचा महत्त्वाचा घटक असलेल्या पोळीला इंग्रजीत काय म्हणतात; तुम्हाला माहीत आहे का? जर तुमचे उत्तर ‘चपाती’ किंवा ‘रोटी’ असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- इंग्रजीत पोळीला एका वेगळ्याच नावाने संबोधले जाते. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : Hindu Rituals : लग्नात नवरदेव घोड्यावर नव्हे, तर घोडीवर बसतो; पण का अन् तेही पांढरीच घोडी का? जाणून घ्या कारण …

पोळीला इंग्रजीत काय म्हणतात?

बऱ्याचदा पोळीला इंग्रजीत ‘रोटी’ किंवा ‘चपाती’ म्हणतात; पण हे इंग्रजी शब्द वाटतात का? पण ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पोळीसाठी चपाती हा शब्द वापरण्यात आला आहे.
इंटरनेटवर सर्च केल्यावर पोळीसाठी अनेक इंग्रजी शब्द सापडतील. चपाती, रोटी, ब्रेड, इंडियन ब्रेड, फ्लॅट ब्रेड, टॉर्टीला (tortilla) इत्यादी नावांनी पोळीला इंग्रजीत संबोधले जाते.

हेही वाचा : Manmohan Singh’s Blue Turban : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग निळ्या रंगाचीच पगडी का घालतात? वाचा त्यामागील खास कारण …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोळीला इंग्रजीत टॉर्टिला म्हणतात …

पोळीला इंग्रजीत टॉर्टिला म्हटले जाते. अनेक देशांमध्ये पोळीला टॉर्टिलाच म्हणतात. टॉर्टिला ही उत्तर अमेरिकेतील मेक्सिको येथे बनवली जाणारी पातळ व गोलाकार पोळी असते; जी मक्यापासून बनवली जाते. पण, आता टॉर्टिला गव्हाच्या पिठापासूनही बनवली जाते.
टॉर्टिला हा इंग्रजी शब्द अनेकांना माहिती नाही. त्यामुळे अनेक भारतीय इंग्रजीत पोळीला चपाती किंवा रोटी म्हणतात.