मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान. दोन वेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांच्या नावे आहे. याशिवाय एक चांगले अर्थतज्ज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात. डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव घेतले की, निळ्या पगडीतील त्यांचा चेहरा आठवतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, मनमोहन सिंग निळी पगडी का घालतात? त्यांची पगडी निळ्या रंगाचीच का असते? आज आपण जाणून घेऊ याविषयी सविस्तर …

२००६ या वर्षी मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत (Cambridge University) ‘डॉक्टरेट ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपण निळी पगडी का घालतो, याविषयी खुलासा केला होता.

BJP may bench prominent leaders
भाजपा पूनम महाजन यांचं तिकीट कापणार? बृजभूषण सिंह, जामयांग नामग्यालही रांगेत.. नेमकं घडतंय काय?
Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?

हेही वाचा : बापाचं काळीज; लेकाची हौस पूर्ण करण्यासाठी आणली सायकल, हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, जेव्हा ते ‘केम्ब्रिज’मध्ये शिकत होते तेव्हा ते निळी पगडी घालायचे. यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव ‘ब्ल्यू टर्बन’ असे ठेवले होते.
डॉ. मनमोहन सिंग सांगतात की, निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. त्यांना निळा रंग खूप आवडतो म्हणून ते निळ्या रंगाची पगडी घालतात. एवढ्या वर्षांनंतर आजही मनमोहन सिंग निळीच पगडी घालतात.

हेही वाचा : ‘या’ वयात करा लग्न; दीर्घकाळ टिकेल नातं; वाचा संशोधन काय सांगते …

वयाच्या नव्वदीत असलेले मनमोहन सिंग हे गेल्या आठवड्यात व्हील चेअरवर राज्यसभेच्या कामकाजाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक जुन्या पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची तुलना करत सध्याच्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.