मसाला हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर येतात विविध मसाले. पावभाजी मसाला, मिसळ मसाला, लोणच्याचा मसाला, वांग्याच्या भाजीचा मसाला, भरताचा मसाला असे कितीतरी प्रकार सांगता येतील. मात्र आपण ज्या अर्थाने हा शब्द वापरतो तो शब्द सध्या प्रचलित असला तरीही मसाला शब्द म्हणजे तिखट किंवा वाटण असे नाही. या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हा शब्द मराठी भाषेतलाही नाही. आपण जाणून घेऊ मसाला शब्दाविषयीची रंजक माहिती.

मसाला शब्द मराठी भाषेत कसा आला?

मसाला हा शब्द अरबी भाषेतला आहे. मात्र ज्या अर्थाने आपण तो शब्द वापरतो तो त्याचा अर्थ नाही. मसाला म्हणजे न्यायनिवाडा किंवा आगाऊ घेतलेली ठेव. सरकारी खर्चासाठी आकारलेली पट्टी म्हणजे मसाला. वादी किंवा प्रतिवादी यांच्यापैकी कुणाला बोलवण्यासाठी शिपाई पाठवला तर त्याचा वाटखर्च म्हणजे मसाला. बाळाजी बाजीराव यांच्या एका पत्रात ‘तुमच्या प्रांताची खंडणी मसाला एक लक्ष रुपये’ असा उल्लेख आहे.

Paris Paralympics 2024 | what is the meaning of The Agitos Logo
Paralympics 2024 : पॅरालिम्पिक लोगोचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या, काळानुसार लोगो कसा बदलला?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Make harbhrayacha thecha in just five minutes
फक्त पाच मिनिटांत बनवा ओल्या हरभाऱ्याचा झणझणीत ठेचा; लिहून घ्या साहित्य आणि कृती
banana raita recipe
श्रावणी सोमवारी बनवा केळ्याचे रायते; नोट करा साहित्य आणि कृती
wheat flour sheera recipe
डब्याला पोळी-भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग बनवा गव्हाच्या पिठाचा शिरा; नोट करा साहित्य आणि कृती
coconut ladu for the prasad
नैवेद्यासाठी बनवा ओल्या नारळाचे लाडू; नोट करा साहित्य आणि कृती
Shravani somvar make Jaggery Makhane
श्रावणी सोमवारी आवर्जून बनवा गूळ मखाणे; नोट करा साहित्य आणि कृती
Shravan special recipe pakatali puri
काहीतरी गोड खावसं वाटतंय? मग झटपट बनवा पाकातल्या पुऱ्या; नोट करा साहित्य आणि कृती

‘मसाला करुन गडावर नेले’ असं वाक्य निवाडापत्रात

‘मसाला करुन गडावर नेले’ असं एक वाक्य इतिहासातल्या निवाडापत्रातही आहे. अशा सगळ्या अर्थाने मसाला हा शब्द वापरला जात असे. मात्र हा शब्द मराठीत आला आणि मिसळणाच्या डब्यात म्हणजेच आपल्या रोजच्या वापरातल्या स्वयंपाक घरातल्या डब्यात जाऊन बसला. त्यामुळे तो झाला ‘मसाला.’ आपण आत्ता ज्या अर्थाने वापरतो तो शब्द आणि मसाला या शब्दाचा मूळ अर्थ या दोन्हींचा अर्थ वेगळा आहे.

‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे. मसाला म्हटलं की कुणाला कुबल किंवा बेडेकर किंवा अगदी हल्ली जाहिरात होणाऱ्या रामबंधू मसाल्याचीही आठवण येईल. मात्र या शब्दाचा मूळ अर्थ वेगळा आहे.