What is Next Of kin Rule : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च मानला जाणाऱ्याने किर्ती चक्राने शहीद अंशुमन सिंग यांना सन्मानित करण्यात आले. मरणोत्तर दिलेलं हे चक्र अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंग आणि मंजू सिंग यांनी स्वीकारला. ५ जुलै रोजी हे चक्र प्रदान करण्यात आलं. मात्र, आता यावरून वाद निर्माण झाला आहे. स्मृती सिंग यांनी हे चक्र स्वतःकडे ठेवून घेतलं असून अंशुमन यांचे सर्व सामान घेऊन त्या माहेर निघून गेल्या असल्याचा दावा अंशुमन यांच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे NOK च्या निकषात बदल केले पाहिजेत, अशी त्यांनी मागणी केली आहे.

अंशुमन सिंग यांच्या पालकांची नेमकी मागणी काय?

“अंशुमन सिंग यांचं लग्न होऊन पाचच महिने झाले होते. त्यामुळे त्यांना मूळ-बाळ नाही. अंशुमन यांची पत्नी स्मृती सिंग या घर सोडून माहेरी निघून गेल्या आहेत. जाताना त्यांनी अंशुमन यांचं सर्व सामान नेलं, तसंच किर्ती चक्रही नेल. या किर्ती चक्राला हातही लावू दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच, अंशुमन यांच्याशी संबंधित सर्व पत्रव्यवहारावरही कायमचा पत्त बदलण्यात आला आहे. अंशुमन यांच्या फोटोव्यतिरिक्त आता त्यांच्याकडे काहीच उरलं नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे Next Of kin Rule च्या नियमांत बदल झाले पाहिजेत”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> Next Of Kin : “मुलाचं सामान आणि किती चक्र घेऊन सून माहेरी निघून गेली, फोटोव्यतिरिक्त…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या आई-वडीलांचे गंभीर आरोप!

NOK म्हणजे काय?

NOK म्हणजे Next of Kin. म्हणजेच निकटवर्तीय किंवा जवळचे नातेवाईक. यामध्ये व्यक्तीचा जोडीदार, जवळचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य किंवा कायदेशीर पालक यांचा समावेश असतो.

NOK चे नियम आणि निकष काय?

एखादा व्यक्ती जेव्हा लष्करात भरती होतो तेव्हा त्याचे पालक हे त्याचे NOK असतात. म्हणजेच, त्याचे निकटवर्तीय म्हणून त्याच्या पालकांची नोंद केली जाते. लष्कर कर्तव्यादरम्यान जर जवान किंवा अधिकारी शहीद झाले तर त्यांच्या पश्चात त्यांचा पालकांना अनुग्राह रक्कम दिली जाते.

लष्करात भरती झाल्यानंतर संबंधित जवान किंवा अधिकाऱ्याने लग्न केले तर नियमानुसार, NOK म्हणून त्यांच्या पत्नीची नोंद केली जाते. त्यामुळे कर्तव्यादरम्यान संबंधित जवान किंवा अधिकारी शहीद झाल्यास अनुग्राह रक्कम पत्नीला दिली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंशुमन सिंग यांच्या वडिलांनी कोणत्या सुधारणा सुचवल्या?

अनेक प्रकरणांमध्ये मुलगा शहीद झाल्यानंतर सूना त्यांची अनुग्राह रक्कम घेऊन निघून जातात. परिणामी शहीद जवानाच्या पालकांना काहीही मिळत नाही. त्यामुळे लष्कराताली अधिकारी किंवा जवान शहीद झाल्यास त्याच्या पत्नी, पालक आणि मुलांसाठी तरतूद केली पाहिजे. त्याच्यावर अवलंबून असलेल्या घरातील सदस्यांचा विचार या नियमांत केला पाहिजे अशी मागणी अंशुमन सिंग यांचे वडील रवी प्रतापसिंग यांनी केली आहे.