भारतात जवळपास सगळेजण Whatsapp या अॅपशी परिचित आहेत. विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वचजण हे अॅप वापरत आहेत. पण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपले वैयक्तिक चॅट्स इतर कोणी वाचू नये. म्हणून बऱ्याचदा ते डिलीट केले जातात. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, Whatsapp चे असे फीचर्स आहेत की, ज्यामुळे तुम्ही तुमचे चॅट्स लपवून ठेवू शकणार आहात. ह्या दोन टिप्स त्यासाठी उपयोगी पडतील.

Can we hide a chat in Whatsapp:

पहिल्या उपायात तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त तुम्हाला जे चॅट लपवायचं आहे, त्यावर लाँग प्रेस करा. त्यानंतर तुम्हाला वर उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील. या तीन ठिपक्यांवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Archieve Chat असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं निवडलेलं चॅट लपलं जाईल. तुम्हाला जर ते चॅट वाचायचं असेल तर चॅट्समध्ये सगळ्यात शेवटी गेल्यावर Archieve Chats (किती चॅट Archieve केलेत त्यांची संख्या) या पर्यायावर क्लिक केलं तर तुम्हाला हे चॅट वाचता येईल. मात्र, दुसऱ्या व्यक्तीला हे चॅट सहजासहजी दिसणार नाही.

Puneri Patya Video
Puneri Patya : “… अन्यथा मत मिळणार नाही” पुणेरी पाट्यांचा विषय जगात भारी, पाहा व्हायरल VIDEO
What is nomophobia?
तुम्हाला स्मार्टफोनपासून दूर राहण्याची भीती वाटतेय का? हे आहे नोमोफोबियाचे लक्षण; जाणून घ्या सविस्तर
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Viral video JCB worker made little boys day remember
“कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना” खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू; VIDEO एकदा पाहाच

How can I hide Whatsapp chat without Archieve:

लक्षात घ्या, Archieve या पर्यायाशिवाय सध्यातरी दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नाही. काही अॅप्स असे आहेत की जे दावा करतात की आम्ही चॅट लपवू शकतो. पण अशा अॅप्सना बळी पडणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे असे कोणतेही अॅप्स वापरणं शक्यतो टाळावं.